प्रतिनिधी
मुंबई : मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी फेसबुक लाईव्ह वर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने भायखळा येथील जेजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. जेजे रुग्णालयाने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या समर्थकांनी बदनामी केल्याचा आरोप रमेश केरे पाटलांनी फेसबुक लाईव्ह मध्ये केला Ramesh Kere, coordinator of Ratha Kranti Morcha, attempted suicide
तपशील देण्यास जेजे रुग्णालयाचा नकार
पैसे उकळण्याच्या आरोपावरून सध्या रमेश केरे पाटील चर्चेत होते. या आरोपामुळे मानसिक ताणातून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने नाशिकहून जेजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. पाटील यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आपण आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले.
लाईव्हवरच त्यांनी विष प्राशन केल्याने हा व्हिडिओही बराच व्हायरल झाला आहे. केरे यांना जेजे रुग्णालयात भरती केल्याबाबत रुग्णालय प्रशासनाने रविवारी दुपारी उशिराने कबुली दिली. मात्र तपशील देण्यास जेजे रुग्णालय प्रशासनाने नकार दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App