विशेष प्रतिनिधी
नाशिक : Ramdas Athawale आमच्यात वाद झाले तर मुख्यमंत्रिपदासाठी मी तयार आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. केंद्रीय नेते आणि आम्ही निर्णय घेऊ, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.Ramdas Athawale
कोणात वाद झाले तर मुख्यमंत्रिपदासाठी मी तयार
पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले म्हणाले, मनोज जरांगेंची भूमिका योग्य, त्यांना आता राजकारण कळू लागले आहे. काही वेळा दोन पावले मागे यावे लागते. मनसे महायुतीमध्ये नाही, त्यांनी काही उमेदवार उभे केले आहेत. भाजप आणि मनसेमध्ये अंडरस्टॅडिंग आहे. मनसेचा युतीला फायदा होणार आहे. मुख्यमंत्री महायुतीचा होणार या राज ठाकरेंच्या मताशी सहमत आहे. आमच्यात वाद होणार नाही. केंद्रीय नेते आणि आम्ही निर्णय घेऊ. कोणात वाद झाले तर मुख्यमंत्री पदासाठी मी तयार आहे, असे त्यांनी थेट सांगितले आहे.
गरीब मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, आरपीआयच्या मतांचा महायुतीला फायदा झाला आहे. हरियाणामध्ये लोकसभेला कमी जागा आल्या, मात्र विधानसभेला जास्त जागा आल्या. आमचा आत्मविश्वास वाढला आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत. तसेच मराठा समाजाच्या मागे सरकार उभे आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे, असे देखील आठवले यावेळी म्हणाले.
कोणाला ओबीसी म्हणायचे हा सर्वस्वी अधिकार केंद्राचा
मनोज जरांगे यांच्याविषयी बोलताना रामदास आठवले म्हणाले, जरांगे फॅक्टर चालणार नाही. मराठा समाजाच्या मागे सरकार उभे आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे, पण केंद्राने आर्थिक 10 टक्के आरक्षण दिले आहे. मनोज जरांगे यांची मागणी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची आहे. सर्व मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देणे शक्य नाही. तसेच कोणाला ओबीसी म्हणायचे हा सर्वस्वी अधिकार केंद्राचा आहे, असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App