विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत भेदभाव झाला असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. वांद्रे येथील मतदान केंद्रावर रामदास आठवले यांच्यासोबत दुजाभाव झाला असल्याचे बोलले जात आहे. Ramdas Athawale
रामदास आठवले दुपारच्यावेळी वांद्रे पूर्व येथील गांधीनगर परिसरातील नवजीवन विद्या मंदिर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते. यावेळी मतदान केंद्रावर अनेक उमेदवार व नेत्यांचे फोटो काढण्यात आले. मात्र रामदास आठवले यांच्यासोबत एकाही फोटोग्राफरला आतमध्ये सोडण्यात आले नाही. निवडणूक आयोगाचे अधिकृत परवानगी असलेल्या फोटोग्राफरला सोबत आतमध्ये सोडण्यास विनंती केली, मात्र तरीही पोलिसांनी परवानगी दिली नाही. हा रिपब्लिकन पक्षासोबत दुजाभाव झाल्याचे आठवले समर्थकांनी म्हणले आहे.
या घटनेनंतर रामदास आठवले यांच्या कार्यालयाने वांद्रे विधानसभा मतदारसंघ नवजीवन विद्यामंदिर मतदान केंद्रावर कर्तव्यवर तैनात असलेल्या पोलिसांची निवडणूक आयोगाकडे तक्रार देण्यात आली आहे. यावर निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे देखील लक्ष असणार आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदान केल्यावर मुंबई येथील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांच्या शाखेला देखील त्यांनी भेट दिली आहे. तसेच 23 तारखेला जोगेश्वरी पूर्वमधून गुलाल आपला उधळायचा आहे, असा विश्वासदेखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात अनेक मतदारसंघात तणाव निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App