प्रतिनिधी
मुंबई : एसटी कर्मचारी येणार नाहीत शरण ठाकरे सरकारचा होणार मरण अशा रामदास आठवले शैलीच्या कवितेमधून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एसटी संपाच्या मुद्द्यावरून ठाकरे पवार सरकारला टोले हाणले आहेत त्याच वेळी त्यांनी जय भिम आहे माझ्या गाठीशी मी तुमच्या पाठीशी असे म्हणत एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहेRamdas Athavale has met the ST employees and supported them
रामदास आठवले यांनी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी मुंबईतल्या आझाद मैदानात संप करत आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. आज रामदास आठवले आझाद मैदानात येऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या खास काव्यशैलीत ठाकरे – पवार सरकारला टोले हाणलेत.
– तर ठाकरे सरकारचं होणार मरण
“एसटीचं झालं नाही विलीनीकरण, तर ठाकरे सरकारचं होणार मरण, कर्मचारी येणार नाहीत शरण, कारण सरकारचं होणार आहे मरण,” अशा काव्यमय शब्दांत आठवले यांनी सरकारला इशारा दिला आहे.
– मी तुमच्या आहे पाठीशी
आठवले यांनी शरद पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. एसटी नसती तर मी पुढारी नसतो, असेही आठवले म्हणाले. “जय भीम आहे माझ्या गाठीशी, मी तुमच्या आहे पाठिशी,” सरकारला सळो की पळो करुन सोडा असे आवाहनही त्यांनी केले.
हे सरकार कधीही जाईल अशी चर्चा आहे, उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर बरे झाले असते, पण आता आम्ही त्यांना सोबत घेणार नाही आणि त्यांना काही देणारही नाही, इशारा देखील रामदास आठवले यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App