प्रफुल्ल पटेल, तटकरेंना चिल्ले पिल्ले म्हणून हिणवणाऱ्या उत्तम जानकारांच्या मुलाचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव, तो देखील राम सातपुतेंच्या पत्नीकडून!!

विशेष प्रतिनिधी

नाशिक : प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या चिल्ले पिल्ले असा उल्लेख करून त्यांना हिणवणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांना आपल्या मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा निवडून आणता आले नाही. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या दहिगाव गटातून जीवन उत्तम जानकर यांचा राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी पराभव केला. त्यामुळे सतत बडबड करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला जनतेने निवडणुकीच्या मैदानात लोळवले.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय सुरू झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी हल्लाबोल केला. यामध्ये उत्तम जानकर आघाडीवर राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस एक करायच्या की नाही, ते शरद पवार आणि सुनेत्र पवार ठरवतील. उगाच इतर चिल्लीपिल्ली आता बोलू लागलीत. त्यांनी गप्प बसावे, असे उत्तम जानकर हे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना म्हणाले होते.

या आधी सुद्धा उत्तम जानकर यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधात स्वतःच्याच गावात बॅलेट पेपरवर मतदान घडवून आणण्याचे राजकीय नाटक केले होते. सोलापूर मध्ये राहुल गांधींना घेऊन येण्याचा आव त्यांनी आणला होता. शरद पवारांनी सुद्धा उत्तम जानकर यांच्या राजकीय नाटकाला हवा दिली होती. त्यामुळे उत्तम जानकर हे फार मोठे नेते असल्याचा भास महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांनी निर्माण केला होता.

प्रत्यक्षात उत्तम जानकर यांना स्वतःच्या मुलाला सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आणता आले नाहीत. भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढत पत्नी संस्कृती सातपुते यांना निवडून आणले. संस्कृती सातपुते यांनी दहिगाव गटात जीवन उत्तम जानकर यांचा पराभव केला. त्यामुळे फक्त माध्यमांमध्ये बडबड करणाऱ्या शरद पवारांच्या आमदारांना जनतेमध्ये किती किंमत उरली आहे, हे जळजळीत राजकीय वास्तव या निकालाने समोर आले.

Ram Satpute fight against Uttam Jankar wins

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात