विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : शिक्षणाचा गंध नसलेल्या गावाचा उंबरठा ओलांडत , संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात शिवेनिंग शिष्यवृत्तीसाठी निवड होण्याचे भाग्य मिळालेय ते म्हणजे लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे येथील २३ वर्षीय राजू केंद्रे या तरुणाला ..
आपण नेहमीच म्हणतो प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे असतो त्याच्या संघर्षाचा इतिहास,असाच काहीसा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या तरुणाचा आहे. लंडनची शिवेनिंग शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची मानली जाते,
आणि या शिष्यवृत्तीसाठी राजू केंद्रे याची निवड झाली. त्यासाठी १६० देशांतील ६३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. देशासह समाजात बदल घडवू पाहणाऱ्या तरुणांना इंग्लंडमध्ये उच्चं शिक्षण घेण्यासाठी जवळपास ४५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळतेय.
राजूला जगातील १८ नामांकित विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आमंत्रित केले असून , लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे ते लंडन हा शैक्षणिक प्रवासाचा टप्पा राजूने गाठला आहे. यामुळे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचे नाव आता सतासमुद्राबाहेर झळकणार आहे.
बाईट – राजू केंद्रे बाईट – आत्माराम केंद्रे , वडील बाईट – जिजाबाई केंद्रे , आई
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App