विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाने दीपक केसरकर यांच्यावर मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली होती. आपल्या युक्तिवादाने केसरकर ठाकरे गटाला नामोहरम करत असतात. त्याचा बदला घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचे एकेकाचे निकटवर्तीय राजन तेली यांच्या हातात मशाल देण्याचा निर्णय घेतला आहे. Uddhav Thackeray to Take Revenge on Deepak Kesarkar, Rajan Teli joining to Thakrey fraction
राजन तेली यांनी गुरुवारी भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांच्याकडून भाजपमध्ये आपले खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप तेली यांनी केला. राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्यात लढत होईल, असे दिसत आहे.
राजन तेली यांची गणना एकेकाळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थकांमध्ये व्हायची. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान राणे कुटुंबीय आणि राजन तेली यांच्यातील संघर्ष उफाळून आला होता. याठिकाणी राजन तेली यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले होते नितेश राणे यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे, असे राजन तेली यांनी म्हटले होते. यानंतर राजन तेली यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवेळी वातावरण प्रचंड तापले होते. या निवडणुकीच्या निकालानंतर राजन तेली यांच्या घरावर दगडफेक झाली होती.
राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दीपक केसरकर आणि राजन तेली हे कट्टर वैरी मानले जातात. हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे घ्यावा, यासाठी राजन तेली आग्रही होते. मात्र, भाजप नेतृत्त्वाने त्यांची मागणी गांभीर्याने न घेतल्याने राजन तेली आता ठाकरे गटात जाणार आहेत.
दीपक केसरकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने मोट बांधली आहे. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनीही दीपक केसरकरांना लक्ष्य केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत केसरकर यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे सेनेचे कार्यकर्ते तयार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजन तेली केसरकर यांना इशारे देत होते मला संघर्ष करायची सवय आहे. मला अशा धमक्या देऊ नका. भाजपचे वरिष्ठ धमक्या देऊ शकतात. केसरकर यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही. भाजपला न्याय मिळवून देण्यासाठी केसरकर यांच्या विरोधात लढत राहणार आहे. माझ्याबरोबर जे असतील त्यांना सोबत घेऊन जाईन. पक्ष सोडण्याचा निर्णय कोणाला घ्यायला सांगणार नाही. आपणाला निवडणूक लढवून जिंकायची आहे. आम्ही लढणार आणि जिंकणार आहे. केसरकर यांच्या राजकारणाचा पर्दाफाश करेन, असे ते म्हणाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App