Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन अशी अवस्था

विशेष प्रतिनिधी

दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण हास्यजत्रा होते. शोले मधील जेलरसारखी परिस्थिती उद्धव ठाकरे यांची होईल. कोई लौटा दे मुझे बिते हुए दिन अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पुण्यात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले,

शरद पवारांच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंची उपयुक्तत संपली आहे. लोकसभेत खोटं बोलून मत घेतली आहेत, आता जनता त्यांना भुलणार नाही, उद्धव ठाकरेंची काँग्रेसच्या दृष्टीने उपयुक्तता संपले आहे, त्यांना दिल्लीमध्ये कोणी भेटत नाही. शरद पवार हे बाळासाहेब असताना भाजप शिवसेना युती तोडू शकले नाही. ते उद्धव ठाकरे यांच्या काळात त्यांनी केलं.उद्धव ठाकरे याचा निवडणुकीत वापर करून घेतील. त्यांना मुख्यमंत्री करणार नाहीत. शरद पवारांनी त्यांचा मोठा मजाक केला आहे

Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियावर EDची पकड, HPZ ॲप घोटाळ्यात चौकशी सुरू


महायुतीच्या जागा वाटपाबाबत ते म्हणाले, 90 टक्के जागेवर एकमत झालं आहे, बाकी लवकरच होणार आहे. इच्छुक असणं वाईट नाही. आमच्याकडे तिकीट मागणं वाईट नाही. समाज म्हणून पक्ष कधी उमेदवार देत नाही, जनता काय म्हणते, उमेदवाराचे स्वतःचे काम काय आहे, यावर ठरते.

महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी त्याग करावा, असे बावनकुळे म्हणाले होते. त्यावर ते म्हणाले, जाणीवपूर्वक माझ्या वाक्याचा विपर्यास केला. मी तसे बोललोच नाही, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे काम करत आहेत. आम्ही मोठा भाऊ म्हणून एकनाथ शिंदे आमच्या सोबत चांगलं काम करत आहेत

उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत ते सोडून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलत आहेत, फडणवीस यांनी दिलेले आरक्षण ठाकरे यांनी घालविले असा आरोप बावनकुळे यांनी केला.

Chandrashekhar Bawankule Criticizes Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात