काका – पुतण्या आमने – सामने : राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर “पत्रबाण”; आदित्यचे प्रत्युत्तर!!


प्रतिनिधी

मुंबई : मशिदींवरचे भोंगे, अयोध्येचा दौरा आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर महाराष्ट्रातले काका – पुतणे आमने – सामने आले आहेत. Raj Thackeray’s “letter arrow” on CM; Aditya’s reply

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येते जाते. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, अशा कठोर शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पत्रबाण सोडला आहे. तर आम्हाला हिंदुत्व शिकवू नका आमचा हिंदुत्वाचा सेवाधर्म आहे असे प्रत्युत्तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे

भोंग्याच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरेंना पत्र लिहत राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. सत्ता येत जात असते, कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन येत  नाही असे या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांची महाराष्ट्रात जी धरपकड चालवली आहे, ती पाहून ते अतिरेकी आहेत काय? असा भास होतो. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांच्या मागे तुमचे पोलीस लागतात. पण मशिदींमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांविरुद्ध तुमच्या पोलिसांनी कधी मोहीम चालवली का?, असा सवाल राज ठाकरे यांनी पत्रात केला आहे. संदीप देशपांडे आणि मनसैनिकांचा पाठीशी पोलीस लागल्याने राज ठाकरे यांनी संतापून मुख्यमंत्र्यांना सत्तेचा कुणी ताम्रपट घेऊन येत नसते. तुम्हीही नाही, असे सुनावले आहे.– आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर

भोंगे, अयोध्याचा दौरा आणि हिंदुत्व या मुद्द्यावर आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. हिंदू धर्म आम्हाला शिकण्याची गरज नाही. सेवा आमचा धर्म आहे. आम्ही दिलेली वचने पूर्ण करणार आहोत. तुम्ही असेच जर आमच्या पाठीशी उभे राहिलात तर नवा महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जी कामं करत आहोत ती तुम्हाला मान्य आहेत का? मान्य असतील तर दोन्ही हात वर करुन आम्हाला आशिर्वाद द्या. नांदेडमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे यांच्या दौ-याबद्दल विचारले असता, त्यांनी बोलणे टाळले आहे. आपण संपलेल्या विषयावर बोलत नाही. जेव्हा संघर्ष सुरु होता, तेव्हा आम्ही अयोध्येला जात होतो. आता संघर्ष संपला आहे. आता आशिर्वाद घ्यायला जाणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षातील लोक एकत्र आले आहेत. आम्ही लोकांची सेवा करत आहोत. कोरोनाचे एवढे मोठे संकट आले. पण आम्ही थांबलो नाही. शेतक-यांची कर्जमाफी केली, रायगड विकासासाठी 600 कोटी रुपये दिले. पण त्याची प्रसिद्धी केली नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

…म्हणून करणार अयोध्येचा दौरा

राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-यासाठी उत्तर प्रदेशातून प्रचंड विरोध होत आहे. आपण त्यावर बोलणार नाही. अयोध्याचा दौरा  राज्यातील विकासाच्या कामांसाठी आणि प्रभूरामचंद्रांचे आशिर्वाद घेण्यासाठी अयोध्येला जात असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Raj Thackeray’s “letter arrow” on CM; Aditya’s reply

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात