प्रतिनिधी
ठाणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे ठाण्याच्या उत्तर सभेत बोलले, पण ते फक्त विकासावरच. वादग्रस्त आणि नाराजीच्या मुद्द्यांची सगळी उत्तरे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर सोडून दिली.Raj Thackeray: Vasant More spoke, but only on development, the answers to controversial issues were left to Rajsaheb
अर्थात हे जे घडले ते मनसेच्या शिस्तीला धरूनच. कारण राज ठाकरे जे बोलतात, जे वागतात, जे सांगतात ती म्हणजे मनसे. हे 100 % समीकरण आहे. त्यामुळे वसंत मोरे काय किंवा अन्य कोणीही त्या पलिकडे जाऊन बोलले ही अपेक्षाही करणे चूक आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरच्या भोंग्यांबद्दल बोलले. त्यावर वसंत मोरे यांनी मीडियाकडे नाराजी व्यक्त केली. फक्त त्यावर तू मीडियाकडे का गेलास? थेट माझ्याकडे का नाही आलास?, असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्या नाराजीवर पडदा टाकला. इतकेच नाही तर त्यांना ठाण्याच्या उत्तर सभेत बोलण्याची संधी देखील दिली.
या सभेत बोलताना वसंत मोरे आपल्या भाषणाचा सगळा भर आपण केलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर ठेवला. पुणे महापालिकेत मनसेचे फक्त दोन नगरसेवक असताना “चर्चेतला चेहरा” म्हणून मनसेचे नगरसेवक वसंत मोरे याला निवडले जाते आणि पुरस्कार देण्याच्या समारंभात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आपल्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर देतात,
ही आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. मात्र, त्याच वेळी भाजप नगरसेवकाला पाडून मी निवडून येतो, असे सूचक विधान देखील त्यांनी केले. आपल्या निष्ठेला कोणताही डाग नाही. राजसाहेबांवर अशी आपली निष्ठा कायम आहे. राज साहेबांनी आपल्याला संधी दिली म्हणून पुणे महापालिकेत आपण 100 % काम करू शकलो हे वसंत मोरे यांनी आवर्जून सांगितले.
भाषणाच्या शेवटच्या दोन मिनिटात वादग्रस्त मुद्द्यांची सर्व उत्तरे राजसाहेब देतील, असे सांगून त्यांनी आपले भाषण संपवले. हे जे घडले तेच मनसेच्या शिस्तीला धरून घडले. कारण फक्त मशिदींवरच्या भोंग्यांवरच्या वक्तव्यावरुन आलेली नाराजी वसंत मोरे यांनी मीडियाकडे व्यक्त केली. त्यावरून राज ठाकरे यांच्याकडून कानपिचक्या खाल्ल्यानंतर त्या कानपिचक्यांमधून वसंत मोरे यांनी पुरेसा धडा घेतला आणि आपल्या भाषणाचा भर त्यांनी फक्त विकासकामांवर ठेवला. यातच सगळे आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App