प्रतिनिधी
मुंबई : मशिदींवरचे भोंगे काढा अन्यथा मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालीसा वाजवला जाईल, असे आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात दिल्यानंतर मनसैनिकांनी आज त्याची ताबडतोब अंमलबजावणी केली. घाटकोपर मध्ये महेंद्र भानुशाली नावाच्या मनसैनिकांनी कार्यालयावर मोठे भोंगे लावून हनुमान चालीसा वाजवला.Raj Thackeray: The horns on mosques remain, but the horns planted by MNS in Mumbai were removed by the police; Over 5000 fine !!
पण लगेच पोलिसांनी कारवाई करत हे भोंगे उतरवले. पोलिसांनी आधी महेंद्र भानुशाली यांना नोटीस पाठवली आणि नंतर लगेच कार्यालयावरचे भोंगे उतरवून वर 5000 रुपयांचा दंड ठोठावला. हे करताना प्रत्यक्षात मुंबईतल्या मशिदींवरचे भोंगे मात्र कायम आहेत.
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याच्या मुद्द्यावरून महेंद्र भानुशाली यांना नोटीस पाठवून यांच्या कार्यालयावर पोलिसांनी कारवाई केली. त्यांनी लावलेले भोंगे पोलिसांनी उतरवले, पण त्याच वेळी मशिदींवरचे भोंगे न उतरवता तसेच ठेवले आहेत.
राज ठाकरे यांनी काल मनसेचे भूमिका स्पष्ट करताना कोणत्याही धर्माचा प्रार्थनेला विरोध नाही. पण मशिदींवर मोठे भोंगे लावून प्रार्थना करण्याची गरज नाही. मशिदींवरचे भोंगे उतरवा मान्यता अन्यथा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावला जाईल, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी भोंगे लावले पण पोलिसांनी ते भोंगे उतरवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App