Raj Thackeray : मराठी म्हण उलटी फिरली…!!; “एक लोहार की नंतर सौ सोनार की” झाली…!!


महाराष्ट्राच्या राजकारणात एक मराठी म्हण उलटी फिरली… “एक लोहार की नंतर सौ सोनार की” सुरू झाली…!! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर हे घडले आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात “एक लोहार की” हाणली त्यानंतर आता महाराष्ट्रात “सौ सोनार की” सुरू झाली आहे…!! Raj Thackeray: Marathi saying turned upside down … !!; “A blacksmith’s key, then a hundred goldsmiths” … !!

“सौ सोनार की एक लोहार की”, अशी मूळ मराठी म्हण आहे. पण राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात पवार ठाकरे यांच्यावर जोरदार ठाकरी तोफा डागत “एक लोहार की” हाणून घेतली. त्यानंतर त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची “सौ सोनार की” सुरू झाली…!!

स्वतः शरद पवार यांच्यापासून ते जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत राष्ट्रवादीचे नेते राज ठाकरेंवर तुटून पडले. आव्हाडांनी गीताचा आधार घेतला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मगळतात संजय राऊत यांच्यापासून ते शिवसेनेच्या नव्या प्रवक्ता नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या पर्यंत सगळे शिवसेना नेते राज ठाकरे यांच्यावर तुटून पडले. भाजपचा भोंगा, अक्कलदाढ उशिरा आली, टाळ्यांची वाक्ये, शिवसेनेचा भगवा, आमचे विकासाचे राजकारण, या शब्दांचा भडीमार संजय राऊत यांनी केला. शीतल म्हात्रे या ईडीची नोटीस राज ठाकरेंना आल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीशी उभी राहील याची आठवण करून दिली. नकलाकार, सी टीमचे नेते, करंटे अशा शब्दांचा भडीमार शीतल म्हात्रे यांनी केला.राज ठाकरेंवर शरसंधान साधणाऱ्यांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांबरोबरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ यांचाही समावेश होता. तसेच शिवसेनेच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार विनायक राऊत यांचाही समावेश होता. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंएवढ्या कडक भाषेत नव्हे, पण आपापल्या शैलीमध्ये त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. यामध्ये अक्कलदाढ, लेक्चरबाजी, बी टीम – सी टीम, वगैरे शब्दांची रेलचेल होती.

हाताची बोटे आणि डझनभर नेते

शरद पवार यांनी तर राज ठाकरे यांचे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी देखील नेते निवडून येत नाहीत, असे कोल्हापुरात म्हटले. पण ज्यांचे नेते हाताच्या बोटावर मोजण्याइतके निवडून येत नाहीत, त्या नेत्याच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यायला मात्र पवारांसकट राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षातले डझनभर नेते बाहेर आले. यामुळेच मूळ मराठी म्हण उलटी फिरली आणि ती “सौ सोनार की एक लोहार की” या ऐवजी “एक लोहारकी सौ सोनार की” अशी झाली…!!

Raj Thackeray : Marathi saying turned upside down … !!; “A blacksmith’s key, then a hundred goldsmiths” … !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था