Raj Thackeray : फोडाफोडी आणि जातीच्या राजकारणाला सर्वस्वी पवार जबाबदार; सगळी जंत्री देत राज ठाकरेंचा पुनरुच्चार!!

विशेष प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्रात फोडाफोडीच्या आणि जातीच्या राजकारणाला सर्वस्वी शरद पवार जबाबदार असल्याच्या आरोपाचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुनरुच्चार केला. याचे पुरावे म्हणून त्यांनी शरद पवारांच्या राजकारणाची सगळी जंत्रीच दिली. आपल्या महापुरुषांना कधी जातीत पाहिलं नाही. संताना आडनावाने किंवा जातीने पाहिलं गेलं नाही. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर या गोष्टी सुरू झाल्या, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. Raj thackeray targets Sharad pawar

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. आज राज ठाकरे हे अमरावती नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

राज ठाकरे म्हणाले :

लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान हे अँटी मोदी आणि अँटी शाह होतं. ठाकरे आणि पवारांच्या प्रेमासाठी मतदान केलं नाही. संविधान बदलण्याच्या कारणामुळे दलितांनी एकगठ्ठा मतदान केलं. त्यांनी पाच वर्षात गलिच्छ राजकारण केलं. लोक या राजकारण्यांना स्वीकारणार नाही. मतदार ही गोष्ट विसरलेले नाहीत. ते विधानसभेत त्याचा राग काढतील. मी फिरतोय, वाचतोय आणि ऐकतोय त्यातून मला जे दिसलं ते मी सांगितलं.

जातीचं विष शरद पवारांनी कालवलं

पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवाद अधिक वाढला. पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण झालं. या सर्व गोष्टींना शरद पवार कारणीभूत आहेत. त्यांनी ही सुरुवात केली. पुलोद स्थापन झाल्यापासून ही गोष्ट सुरू आहे. शरद पवार यांनी 1991 ला शिवसेनेचे आमदार फोडले. छगन भुजबळ वगैरे फोडले. त्यानंतर अनेक लोकांना फोडलं. गणेश नाईकांना फोडलं. नारायण राणे गेले. हे सर्व राजकारण शरद पवार यांनी सुरू केलं. जातीचं विषही शरद पवार यांनीच कालवलं.

1999 ला राष्ट्रवादी स्थापन झाली. त्यानंतर आणि त्यापूर्वीचा महाराष्ट्र पाहा. आपल्या महापुरुषांना कधी जातीत पाहिलं नाही. संताना आडनावाने किंवा जातीने पाहिलं गेलं नाही. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर या गोष्टी सुरू झाल्या. असा महाराष्ट्र कधीच नव्हता. 1990 नंतर हा जातीयवाद सुरू झाला. हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे. हा विषय लोकसभा किंवा विधानसभेसाठीचा नाही. हा घराघरात गेलेला विषय आहे. छोट्या मुली आणि मुलं देखील जातीचा मित्र वगैरे बोलायला लागलेत. हे जाती जातींमध्ये विष शरद पवारांनी कालवलं!!

Raj thackeray targets Sharad pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub