Raj Thackeray : राज ठाकरे यांची ईव्हीएमवर पुन्हा शंका; विधानसभेतील दारुण पराभवानंतर कार्यकर्त्यांशी साधला संवाद

Raj Thackeray

वृत्तसंस्था

मुंबई : Raj Thackeray विधानसभेतील दारुण पराभवानंतर गुरुवारी, 30 जानेवारी रोजी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. २०१९च्या लोकसभा निकालानंतर त्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. त्याची पुनरावृत्ती त्यांनी या संवादात केली. त्यांनी भाजपच्या वेळोवेळी बदललेल्या भूमिका तपशिलासह सांगितल्या. शरद पवार, शिवसेनेने भूमिका बदलली की ती परिस्थितीनुरूप असते आणि माझ्या निर्णयावर भूमिका बदलाचा ठपका ठेवला जातो, असे सांगत ते म्हणाले की, या सगळ्यांनी स्वार्थासाठी भूमिका बदलली. मी कोणत्याही स्वार्थासाठी भूमिका बदलली नाही.Raj Thackeray

राज म्हणाले की, मोदींनी अजित पवारांवर ७० हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला. त्यांना आत टाकू म्हणत मंत्रिमंडळात टाकलं. अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळ्याचा आरोप करून त्यांना राज्यसभेवर पाठवलं. फडणवीसांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आता त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. शिवसेनेने यापूर्वी मुस्लिम लीगशीही युती केली. माझ्या मागे ईडी लावली म्हणून मी भूमिका बदलली, अशी टीका काही लोक करतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन सांगतो की ईडीचा आणि पाठिंब्याचा काहीही संबंध नाही.



युतीची आशा मावळली

लोकसभा, विधानसभेला मनसेने भाजपला साथ दिली. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही मनसे-भाजप युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, गुरुवारी त्यांनी केलेली वक्तव्ये पाहता युतीची आशा मावळली आहे.

Raj Thackeray doubts EVMs again; interacts with workers after crushing defeat in the Assembly

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात