वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाने तुफान बॅटिंग केली. त्यामुळे कोकण, घाटमाथा, समुद्र किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महापुराने थैमान घातले. आता पुढील बारा दिवस पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागाला काहींसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.Rain forecast : Less rainfall in Upcoming Twelve days In The State; Relif to the flooded area
पुढील किमान बारा दिवसात अनुक्रमे पहिल्या आठवड्यात १ ते ५ ऑगस्ट दरम्यान उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भाग, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे.
दुसऱ्या आठवड्यात ६ ते १२ ऑगस्ट दरम्यान उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहील. मात्र, अधून-मधून हलक्या सरी कोसळतील. दुसऱ्या आठवड्यात राज्यात सर्वदूर सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची शक्यता आहे. कोकणात मात्र पावसाच्या सरी सुरूच राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App