Tokyo Olympics : टोक्यो ऑलिम्पकमध्ये आज भारत निराश : बॉक्सर पुजा रानीसह पीव्ही सिंधू पराभूत ; ‘सुवर्ण’संधी हुकली


  • भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला ऑलम्पिकच्या सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पी. व्ही. सिंधूचं आता पुढील लक्ष्य हे कांस्य पदक मिळवणं असणार आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: सुवर्णपदकाच्या आशेने मैदानात उतरलेल्या पी.व्ही.सिंधूचं स्वप्न पुन्हा एकदा भंग पावलं आहे. उपांत्य फेरीत चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सिंधूवर दोन सरळ सेटमध्ये मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.Tokyo Olympics: India disappointed in Tokyo Olympics today: Boxer Puja Rani and PV Sindhu lose; ‘Golden’ opportunity missed

पुजा रानी पदकापासून दूरच

पहिला सेट पिछाडी भरुन काढत जिंकल्यानंतर ताई त्झु यिंगने दुसऱ्या सेटमध्ये सिंधूला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यामुळे सिंधूला आता कांस्यपदकासाठी खेळावं लागणार आहे.

पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचं मोठं आव्हान सिंधूसमोर होतं. परंतू दुर्दैवाने या सेटमध्ये तिची सुरुवात चांगली झाली नाही. परंतू वेळेत स्वतःला सावरत सिंधूने दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक केलं. परंतू पहिल्या सेटमध्ये पिछाडी भरुन काढत लिड घेतलेल्या यिंगने सिंधूला दुसऱ्या सेटमध्येही कडवं आव्हान द्यायला सुरुवात केली. ताई त्झु ने पहिल्या सेटप्रमाणे दुसऱ्या सेटमध्येही क्रॉसकोर्ट बॅकहँड फटक्यांचा वापर करत सिंधूला थकवण्यास सुरुवात केली. यिंगच्या याच रणनितीला बळी पडलेल्या सिंधूने मग दुसऱ्या सेटमध्ये चुका करायला सुरुवात केली. सिंधूचे अनेक फटके बाहेर जायला सुरुवात झाल्यामुळे ताई त्झु ला फायदा मिळाला. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत यिंगने ११-७ अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटच्या मध्यांतरानंतरही ताई त्झु यिंगने ही आघाडी कायम ठेवली. आपली आघाडी ७ गुणांनी वाढवत यिंगने सिंधूला बॅकफूटला ढकललं. यिंगच्या झंजावातासमोर दुसऱ्या सेटमध्ये सिंधूची देहबोली हताश जाणवायला लागली. मध्यला काही क्षणांसाठी सिंधूला एक संधी मिळाली. परंतू क्रॉसकोर्ट फटके खेळण्याच्या नादात सिंधूने पुन्हा चूक करत यिंगची आघाडी आणखी मजबूत केली. यानंतर सामन्यात कमबॅक करत सिंधूला शक्यच झालं नाही. २१-१२ च्या फरकाने दुसरा सेट जिंकत ताई त्झु यिंगने अंतिम फेरीत प्रवेश केला.

Tokyo Olympics: India disappointed in Tokyo Olympics today: Boxer Puja Rani and PV Sindhu lose; ‘Golden’ opportunity missed

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात