वृत्तसंस्था
मुंबई : तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक करता तेव्हा, रेल्वे तुम्हाला फक्त ३५ पैशांमध्ये प्रवास विमा देते. या विम्यामुळे विमा कंपनी रेल्वे प्रवासातील नुकसान भरून काढते. यामध्ये १० लाख रुपयांपर्यंतचे कव्हर उपलब्ध आहे. Railway Ticket online Booking Travel insurance
अपघातानंतर प्रवाशाला विम्याची रक्कम दिली जाते. यामुळे तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक कराल तेव्हा रेल्वे प्रवास विम्याचा पर्याय नक्कीच निवडा. जेव्हा तुम्ही विमा पर्याय निवडता, तेव्हा तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक लिंक पाठवली जाईल. ही लिंक विमा कंपनीची आहे. या लिंकला भेट देऊन, तुम्ही तेथे नॉमिनी तपशील भरणे आवश्यक आहे. विमा पॉलिसीमध्ये नॉमिनी असल्यासच विमा दावा उपलब्ध होतो.
रेल्वे अपघातात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात यातून मदत होते. रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास १० लाख आणि पूर्णपणे अपंगत्व आल्यास त्याला १० लाख रुपये मिळतात. अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ७.५ लाख रुपये, दुखापत झाल्यास २ लाख रुपये रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाच्या वाहतुकीसाठी विमा कंपनी १० हजार रुपये देते.
रेल्वे अपघात झाल्यास, ती व्यक्ती, नॉमिनी किंवा त्याचा वारसदार विम्याचा क्लेम करू शकतात. यासाठी तो विमा कंपनीच्या जवळच्या कार्यालयात जाऊन विमा क्लेम करू शकतो. आधार कार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे जमा करावी लागतात. रेल्वे अपघातानंतर ४ महिन्यांच्या आत विम्याचा क्लेम करता येतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App