राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर

विशेष प्रतिनिधी

अहिल्यानगर : राहुरी विधानसभा‎ पोटनिवडणुकीच्या रिंगणात ‎सुरूवातीला “बिनविरोध” ‎‎निवडणुकीची चर्चा झाली. पण ‎‎जसजशी निवडणूक जवळ येत‎ आहे तसे इच्छुकांची भाऊगर्दी‎ वाढताना दिसत आहे. भाजपकडून ‎‎अक्षय कर्डिले यांना उमेदवारी‎ देण्यात आली. पक्षश्रेष्ठींकडून ‎‎निवडणूक बिनविरोध व्हावी‎ यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. पण ‎‎निवडणुकीच्या मैदानात‎ विरोधकांची संख्या वाढत असून ‎‎भाजपपुढे आव्हान उभे राहण्याची ‎‎चिन्हे दिसत आहेत. राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. वंचितकडून अहिल्यानगर कार्यकारिणीच्या बैठकीत अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



काँग्रेससुद्धा निवडणूक लढण्यास इच्छूक

राहुरीच्या या रणांगणात आता पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे वंचितने आपला उमेदवार जाहीर केला असताना, दुसरीकडे काँग्रेसनेही राहुरी आणि बारामतीमध्ये निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेसकडूनही स्वतंत्र उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने ही लढत बहुरंगी आणि चुरशीची ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रयत्न “बिनविरोध”साठी,‎पण चर्चा “विरोधकांची”!‎

अर्ज भरण्याच्या तिसऱ्या ‎‎दिवसापर्यंत 50 इच्छुकांनी तब्बल 103 अर्ज नेले. तर गोविंद मोकाटे ‎यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल‎ करत श्रीगणेशा केला आहे. 6‎ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत‎ असून, 9 एप्रिलच्या माघारीनंतरच‎ निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.‎ केवळ कर्डिले आणि तनपुरेच नव्हे,‎ तर काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष ‎बाळासाहेब आढाव, शिंदे यांच्या‎ शिवसेनेकडून राजुभाऊ शेटे आणि‎ शिवसेना (उद्धव बाळासाहेब‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ठाकरे) गटाचे जिल्हाध्यक्ष ‎रावसाहेब खेवरे यांनीही उमेदवारी‎अर्ज नेल्याने महायुती आणि ‎महाविकास आघाडीतील‎ मित्रपक्षांची भूमिका गुलदस्त्यात‎ आहे. याशिवाय मनसे, वंचित‎ बहुजन आघाडी, एमआयएम,‎ बसपा, आरपीआय (आठवले‎गट) आणि प्रहार जनशक्ती ‎पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही दंड‎ थोपटले आहेत.

वरवर पाहता ही निवडणूक सोपी ‎वाटत असली तरी, मित्रपक्ष ‎असलेल्या शिवसेना (शिंदे गट)‎ आणि राष्ट्रवादीच्या काही गटांना ‎शांत ठेवणे भाजपसाठी कठीण जात‎ आहे. निवडणूक “बिनविरोध” ‎करण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न ‎केले होते, मात्र इच्छुकांची वाढती ‎संख्या पाहता आता या नेत्यांना ‎थांबवून निवडणूक एकतर्फी करणे हे ‎भाजपसमोर मोठे आव्हान ठरणार ‎आहे. 9 एप्रिलपर्यंत किती जणांचे‎ मन वळवण्यात भाजपला यश येते,‎ यावर निवडणुकीची गणिते‎ अवलंबून असतील.‎

Rahuri Bypoll: Vanchit Bahujan Aghadi Fields Anil Jadhav; Unopposed Bid Fails

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात