विशेष प्रतिनिधी
पुणे : एका सिलिंडरमधून दुसर्या सिलिंडरमध्ये गॅस भरून चोरी करत काळाबाजार करणार्या तीन जणांच्या टोळीला गुन्हेशाखेच्या युनिट दोनने बेड्या ठोकत बेकायदेशिर गॅस चोरीचा पर्दाफाश केला आहे. जयकिसन मियाराम बिश्नोई (27) जगदिश नारायणराम बिश्नोई (27) आणि जगदिश नारायण बिश्नोई (27, तिघेही रा. उरूळी देवाची, अशोक देसाई यांचा बंगला, ता. हवेली जि. पुणे मुळ रा. जोधपुर, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तिघेही सिलिंडरचा पुरवठा करतात.
आठ दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी करून लहान सिलेंडरमध्ये भरताना आगीचा भडका उडून 22 सिलेंडरचा स्फोट झाला होता. या पार्श्वभूमीवर संबधीतांवर कारवाई होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. याच अनुषंगाने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गॅसचा काळाबाजार करणार्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या विरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. अशाच पध्दतीने गॅसची चोरी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 2 ला मिळाली होती.
ही गॅसची चोरी उरूळी देवाची येथील एका गोदामात बेकायदेशिर सुरू असल्याचे त्यांना समजले. या ठिकाणी नळीद्वारे अनधिकृतरित्या भरून (पल्टी सिलिंर) त्या गॅस सिलिंडरची विक्री करून काळा बाजार करताना आढळून आले. युनिट 2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील व त्यांच्या कर्मचार्यांनी उरूळी देवाची येथे जाऊन गुप्तपणे पाहणी केली. वज्रेश्वरी देवी मंदीराच्या मागील बाजुस असलेल्या अशोक देसाई यांच्या बंगल्यामध्ये तीन व्यक्ती संशयीतरित्या वावरत असल्याचे दिसले.
सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण 31 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. यावेळी तिघांकडून 19 किलोचे 31 गॅस सिलिंडर त्यामध्ये भारत कंपनीचे 26, एचपी कंपनीचे 5 गूस सिलिंडर, 5 किलोचा एक रिकामा सिलिंडर असा 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर समोरच वायगंडे यांच्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत बंद पडलेल्या तीन चाकी टॅम्पोमध्ये सहा रिकामे सिलिंडर सापडले.
याबबात तहसीलादारांना कळवून तिघांना न्यायालयात हजर करून त्यांची 9 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलिस फौजदार यशवंत आंब्रे, असलम पठाण, संजय जाधव यांनी ही कारवाई केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App