विशेष प्रतिनिधी
पुणे : समाजातील एक महत्त्वाचा घटक असणारा तृतीयपंथी हा समाज. या समाजाला कायमच अनेक ठिकाणी दुय्यम प्रकारची वागणूक दिल्या जाते. या समाजाचा उदरनिर्वाहाचा, रोजी रोटीचा प्रश्न आजही मोठा बिकट आहे आहे. Pune Municipal Corporation To Have twenty five Transgender pepole for service…
केवळ ते तृतीयपंथी आहेत म्हणून आजही त्यांना अनेक ठिकाणी कामं नाकारले जातात. मात्र पुणे महानगरपालिकेने पुरोगामीतवाच एक पाऊल उचलत समाजासाठी एक आदर्श घालून दिला आहे. समाज सुधारकांच शहर असणाऱ्या पुण्यात आता पुणे महानगरपालिकेच्या वतीने तृतीयपंथीयांना महापालिकेच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घेतलं जाणार आहे. अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त कुणाल खेमनार यानी दिली आहे. सुरक्षा विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानुसार २५ तृतीयपंथी व्यक्तींना ठेकेदारामार्फत नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, मनपा भवन तसेच अनधिकृत बांधकाम निर्मुलन व अतिक्रमण विभागाच्या कारवाई करताना तृतीयपंथी यांना आदी ठिकाणी नेमणूक दिली जाणार आहे.
सध्या कार्यरत असलेल्या सैनिक सेक्युरिटी प्रा. लि. व गल सेक्युरिटी प्रा. लि. या खासगी कंपनीकडून यांना वेतन तसेच सरकारी देय हे दिली जाणार आहेत.पुणे महापालिकेच्या हा स्तुत्य उपक्रम तृतीयपंथीयांना सामाजिक जीवनात मानाचा मोठा स्थान मिळवून देणारा ठरणार आहे..
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App