विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात कायम स्त्री प्रश्नासाठी रणरागिणी म्हणून समोर येणाऱ्या ,भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि आता लवकरच राजकीय क्षेत्रातही कार्यरत होणाऱ्या तृप्ती देसाई सध्या माध्यमांमध्ये चांगल्याचं चर्चेत आहेत. Social activist Trupti Desai Recalled the memories Marathi Bigg Boss season Three
त्यांनी त्यांची राजकीय महत्त्वकांक्षा उघडपणे बोलून दाखवत . बारामती लोकसभा मतदार संघातं येणाऱ्या निवडणुकीसाठी उभ राहण्याचं निश्चित केलं आहे आणि पवार घराण्यावर घराणेशाहीचा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांना चांगलंच आवाहन दिलं आहे.
तृप्ती देसाई यांनी नुकतीचं द फोकस इंडियाच्या गप्पाष्टक या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली आणि त्या रंगलेल्या गप्पांमध्ये बिग बॉस तीन चा विषय निघाला. तृप्ती देसाई यांचे आज वर अनेक आंदोलन गाजली.. शनिशिंगणापूरचं आंदोलन , केरळचं शबरीमला आंदोलन, हाजी अली आंदोलन असेल या आंदोलनात त्यांची कणखर आणि रणरागिणीची भूमिका लोकांच्या समोर आली होती.
तृप्ती देसाईंनी ‘राजकीय इनिंग’साठी का केली बारामतीचीच निवड?, पवार कुटुंबावर निशाणा!
मात्र बिग बॉस तीनच्या प्रवासात तृप्ती देसाई प्रेक्षकांना काहींशा मवाल, समजूतदार या दिसल्या. या प्रश्नावर उत्तर देताना तृप्ती देसाई म्हणाल्या , बिग बॉस मुळे मला माझी खरी प्रतिमा लोकांसमोर येण्यास मदत झाली.. मी आंदोलनात आक्रमक होते म्हणजे मी खऱ्या आयुष्यातही तितकीच आक्रमक आहे असं नाहीयं मला माझं स्वतःचं कुटुंब आहे संघटनेचे कुटुंब आहे माझे कार्यकर्ते आहेत सगळ्यांना मी कायम समजून घेत असते… आणि तसंच मी बिग बॉसच्या घरातही ताई या नात्याने सगळ्यांना समजून घेतलं.
त्या घरात मला भरपूर मान मिळाला आणि मी कशी आहे ते खऱ्या अर्थाने जनतेसमोर आलं. बिग बॉस मध्ये आल्यावर लोकांची इमेज खराब होते. मात्र बिग बॉस मुळे मला माझी इमेज सुधारायची संधी मिळाली. बिग बॉसच्या सगळ्या टीमने मला भरपूर आदर दिला. माझ्या आयुष्यातला तो खूप चांगला एक टप्पा होता. त्या सीजन मधला प्रत्येक जण आजही माझ्या संपर्कात आहे. आम्ही चांगले मित्र आहोत. आणि जेव्हा मी सर्वसामान्य जनतेत जाते तेव्हा. बिग बॉस मधल्या तृप्ती म्हणून एक वेगळेच प्रेम मला मिळतं.
बिग बॉस खरच क्रिप्टेड असतं का या प्रश्नावर तृप्ती.. देसाई म्हणाल्या.
बिग बॉस अजिबात स्क्रिप्टेड नसतं.. तिथे जे काय होतं ते सगळं त्या त्या वेळची रिएक्शन असते .. तो एक माईंड गेम आहे .. फार वेगळा असा तो एक अनुभव आहे .. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर आतून स्ट्रॉंग असाल तरच स्वतःवर कंट्रोल ठेवू शकता.. आणि तो ठेवण्यात मी यशस्वी झाले.. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तृप्ती त्यांनी या मुलाखतीत दिली आहे.. तृप्ती यांच्या बिग बॉस प्रवासाबद्दल आणखी जाणून घ्यायचं असल्यासं ही मुलाखत बघायला विसरू नका..
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App