पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात मेट्रो प्रवासाला पसंती दिली आहे. एक आठवड्यात सव्वा दोन लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला असून मेट्रोला ३२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
प्रतिनिधी
पुणे –पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या उपस्थितीत पुणे मेट्राेच्या दाेन मार्गिकांचे उदघाटन पार पडले. त्यानंतर नागरिकांनी सहकुटुंब मागील आठवडाभरात मेट्राे प्रवासाला पसंती दिल्याचे चित्र आहे. सदर कालावधीत सहा मार्च ते १३ मार्च दरम्यान एकूण दाेन लाख २७ हजार ९५० प्रवाशांना मेट्राेद्वारे प्रवास केला असून मेट्राेला एकूण ३२ लाख ४५ हजार ६७३ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. Pune metro earning ३२ lakhs revenu in one week
सहा मार्च राेजी पुणे मेट्राेचे पंतप्रधान यांनी उदघाटन केले अाणि त्यानंतर दुपारी तीन वाजेनंतर वनाझ ते गरवारे अाणि पीसीएमसी ते फुगेवाडी या दाेन मार्गावर मेट्राेची सेवा सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी ३७ हजार ७५२ प्रवाशांनी मेट्राेचा प्रवास करत मेट्राेला पसंती दिली. त्यानंतर मेट्राेतून प्रवास करण्याचे उत्सुकतेने माेठया संख्येने नागरिकांनी मेट्राेतून प्रवास केला.
१३ मार्च राेजी ६७ हजार ३५० नागरिकांनी मेट्राेतून प्रवास केला. एका दिवसात प्रवास करण्याची ही आतापर्यंत सर्वात माेठी संख्या असून त्याद्वारे मेट्राेला दहा लाख सात हजार ९४० रुपये उत्पन्न मिळाले. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, कुटुंबे तसेच विविध प्रकारचे गट, काही शाळेतील विद्यार्थी यांनी मेट्राे सफारीचा अनुभव घेतला आहे.
साधारणपणे एक आठवडयाचा विचार करता, सरासरी ३४ हजार २४३ नागरिकांनी प्रतिदिन मेट्राेने प्रवास केला असून त्याद्वारे मेट्राेला सरासरी चार लाख पाच हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. प्रवाशांच्या साेयीसाठी मेट्राेने माेबाईल अँप उपलब्ध करुन दिले असून आतापर्यंत २६ हजार ७४२ नागरिकांनी हे अँप डाऊनलाेड करत त्याचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे माेबाईलद्वारे तिकिट काढण्याचे प्रमाणातही वाढ झालेली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App