वृत्तसंस्था
पुणे : राज्यात दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. मात्र, 7 मे पर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पूर्व मोसमी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. Pune IMD alerts rain with thunderstorm in Maharashtra till 7 May
गारपीट होण्याची शक्यता
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात निर्माण झाल्यानं मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता आहे. गेल्या 24 तासात बुलडाणात सर्वाधिक 30 मी. मी. आणि पुण्यात 27 मी. मी पावसाची नोंद झाली
पुण्यात वीज पडून दोन मुलींचा मृत्यू
भोर नसरापूर गावात अंगावर वीज कोसळून दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. सीमा अरुण हिलम (वय 11) आणि ,अनिता सिकंदर मोरे (वय 9) यांचा मृत्यू झाला. चांदणी प्रकाश जाधव ही जखमी आहे.
महत्त्वाची बातमी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App