Pune Drugs : सत्तेच्या वळचणीला बसा, एकमेकांचेच वाभाडे काढा; भाजप – राष्ट्रवादीत रंगला कलगीतुरा!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्स विक्री झाली. त्याचे सेवन झाले. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने ताबडतोब सूत्रे हालवून बेजबाबदार पोलिसांना निलंबित केले. पब आणि बार सील केले. हे सगळे होत असताना प्रत्यक्षात भाजप आणि राष्ट्रवादीत मात्र सत्तेच्या वळचणीला बसा आणि एकमेकांचे वाभाडे काढा!!, असले प्रकार सुरू झाले.Pune drugs case, BJP – ajit pawar’s NCP leaders targets each other

पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणी आता कारवाईला वेग आलाय. पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात एकूण 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना अटक करण्यात आली. सीसीटीव्हीच्या (CCTV) मदतीने 40 ते 50 जणांचा शोध घेतला जातोय. ड्रग्ज घेणारी अल्पवयीन मुलं होती का??, याचा तपास केला जातोय. तसंच अशा प्रकारे कोणत्या बारमध्ये ड्रग्ज पार्ट्या झाल्यायत का हे देखील पाहिलं जातंय. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बारमालकांसह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल केलाय. आता व्हिडिओत दिसणाऱ्यांचा शोध लागल्यानंतर आणखी मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.



पण या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी राजकीय प्रगल्भता दाखवण्याऐवजी एकमेकांचे वाभाडे काढायला सुरुवात केली. पुण्यात सुरू असलेले ड्रग आणि अवैध धंदे अजित पवार यांच्या कार्यकाळात सुरू असल्याचं आरोप भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला. मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा चिंताजनक गोष्टी घडत नव्हत्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केले. त्यांचा रोख विद्यमान पालकमंत्री अजित पवारांवर असल्याची चर्चा सुरू झाली.

याला राष्ट्रवादी अजित पवार गटानंही जोरदार पलटवार केलाय. ड्रग्स सेवनाला उत्तेजन चंद्रकांत पाटील यांच्याच काळात मिळालं, हे सगळे अवैध धंदे छुप्या पद्धतीने सुरू होते. उलट अजित पवारांमुळे अवैध छुपे धंदे उघडकीस आले असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटलांनीही पोलिसांसह सरकारवर निशाणा साधला. गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला. ललित पाटील प्रकरणानंतर ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडिओ काल व्हायरल झाले. पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळतेय. तर विद्येच्या माहेरघराची ओळख ड्रग्ज, पब्जचे माहेरघर होतंय. पुणे शहर सत्ताधारी भाजप, शिंदे सरकारमुळे बदनाम होतंय, असा निशाणा जयंत पाटलांनी साधला ते काही असले तरी जयंत पाटील विधान विरोधकांमध्ये म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये तरी आहेत, पण चंद्रकांत पाटील राज्याचे मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते, तर अमोल मिटकरी अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते आहेत. पण त्यांनीच पुणे ड्रग्स प्रकरणात एकमेकांविरुद्ध वक्तव्य करून एकमेकांचे वाभाडे काढले.

पुणे पोलिसांची कारवाई

त्या राजकीय वादात गृह मंत्रालयाने आपली कामगिरी चोख बजावली. पुण्यातील ड्रग्ज व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांना निलंबित केले.

Pune drugs case, BJP – ajit pawar’s NCP leaders targets each other

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात