सत्तेच्या वळचणीला राहूनही अजितदादांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता; स्वतःच्या ताकदीपेक्षा जास्त “मलई” मिळवण्याची वखवख!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला तोटा झाला अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये घेऊनही मतांच्या अंकगणितात अथवा टक्केवारीत भाजपला फायदा झाला नाही. उलट भाजपच्या जागा 23 वरून 9 वर आल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत कमी जागा लढवून देखील आपला परफॉर्मन्स दाखवता आला नाही.Ajit pawar’s NCP wants to grab more power than their election performance

अजित पवारांना आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून निवडून आणता आले नाही, तरी देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेच्या वळचणीला राहून जास्तीत जास्त सत्तेची मलई खाण्याची वखवख मात्र थांबलेली नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते ही वखवख जाहीरपणे बोलून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुनेत्रा पवारांचे समर्थक, छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ ही याची उत्तम उदाहरणे आहेत.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून जी वक्तव्ये येतात, त्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुप्त संताप आहे.



वास्तविक अजित पवारांनी भाजपच्या सत्तेच्या वळचळणीला राहून देखील लोकसभा निवडणुकीत अपेक्षित असा परफॉर्मन्स दाखवला नाही, तरी आपल्या पत्नीला राज्यसभेत बिनविरोध निवडून आणले. पण आता अजित पवारांची राष्ट्रवादी इतपतच समाधानी मानायला तयार नाही. सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून येऊन एक दिवसही उलटला नाही, तोच बारामती त्यांच्या भावी केंद्रीय मंत्रिपदाचे बोर्ड झळकले. जणू काही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इच्छेशिवाय सुनेत्रा पवार मंत्री होणार आहेत!!, असा अविर्भाव अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आणला. “हारी बाजी को जो जीता है वो सिकंदर कहलाता है!!” असे बोर्ड अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झळकवले.

छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच परस्पर लोकसभा उमेदवारीची आस लावून बसले होते. ती त्यांची आस पूर्ण झाली नाही म्हणून सतत अस्वस्थ राहिले आणि महायुतीच्या गाडीला आपल्या वक्तव्यांमधून पंक्चर करत राहिले. भाजप नेत्यांनी भुजबळांना योग्य वेळी चपखल उत्तर देऊन चाप लावला नाही.

वास्तविक छगन भुजबळ आजही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहुन मंत्रीपदावर कायम आहेत, तरी देखील त्यावर समाधान न मानता भुजबळांना लोकसभा नाहीतर राज्यसभेवर जाण्याची तहान लागली होती. त्यांनी आपल्या मनातली खदखद जाहीरपणे बोलून दाखवली. भुजबळांच्या या खदखदीला हसन मुश्रीफांनी खतपाणी घातले. भुजबळ यांना लोकसभेचे तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांना अपमान झाल्यासारखे वाटले, पण आता राज्यसभेचे तिकीट मिळाले नाही म्हणून ते अस्वस्थ नाहीत, अशी मखलाशी हसन मुश्रीफ यांनी केली.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत स्वतःचा पक्ष वाढवून विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे नेण्याची जिद्द दिसत नाही, पण भाजपच्या सत्तेच्या वळचणीला बसून मिळाली, ती सत्तेची पदे उपभोगून जास्तीत जास्त सत्तेची मलई खाण्याची मात्र वखवख कायम आहे, हेच यातून दिसते आणि भाजपचे नेते आपल्या बैठकांमध्ये मग्न राहून राष्ट्रवादीला चाप लावण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे वर्तमान भाजप कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत आहे.

Ajit pawar’s NCP wants to grab more power than their election performance

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात