हिट अँड रन केसचे 6 बळी, जळगाव आणि पुणे; बिल्डर आणि राष्ट्रवादीचे कनेक्शन आले पुढे!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : हिट अँड रन केसचे 6 बळी जळगाव आणि पुणे बिल्डर आणि राष्ट्रवादीचे कनेक्शन आले पुढे!! असे खरंच घडले आहे.Pune and jalgaon hit and run cases : builder and NCP connection on the forefront!!

हीट अँड रन केसच्या पुणे आणि जळगाव या दोन्ही केसेस मध्ये बिल्डर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच कनेक्शन समोर आली. पुण्याच्या केस मध्ये ब्रह्मा कॉर्पचे प्रमुख विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याने पब मध्ये दारू पिऊन पोर्शे कार अति वेगवान चालवून एक मुलगा आणि एक मुलगी असे 2 सॉफ्टवेअर इंजिनियर्सचे बळी घेतले. पण तो लहान असल्याचे कारण दाखवून न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर ही केस पुन्हा उभी राहिली आणि वेदांत अग्रवाल याला जामीन नाकारून त्याला बाल सुधार गृहात पाठवले.



परंतु, दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे त्याला वाचवायला पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यामुळे राज्यभर या प्रकरणाचा गदारोळ झाला. अग्रवाल कुटुंब – छोटा राजन आणि पवार कुटुंब त्यांच्या गुंतवणुकी तसेच पब आणि बार यांच्यातील “पवार कनेक्शन” या निमित्ताने समोर आली. एरवी महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प बसल्या आणि खासदार शरद पवार देखील काही बोलले नाहीत. अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोनवरून तपासासंदर्भात सूचना दिल्यानंतर स्वतः अजित पवार पुण्याकडे फिरकले नाहीत.

 

एकीकडे पुण्याच्या हिट अँड रन केस मध्ये बड्या बिल्डरचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे कनेक्शन गुंतलेले असताना दुसरीकडे जळगाव मधल्या हिट अँड रन केस मध्ये एकाच कुटुंबातल्या 4 जणांचे बळी गेले आणि त्या केस मध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिल्डरचा मुलगा यांचे कनेक्शन समोर आले. जळगावची हिट अँड रन केस पुण्याच्या केस पेक्षा आधीची आहे.

7 मे 2024 रोजी जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथे अशीच भरधाव वेगाने कार चालवून दोघांनी एकाच कुटुंबातल्या चौघांचे बळी घेतले. कार मध्ये असलेले दोघेजण बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार हे होते. हे दोघेही अपघातात जखमी झाले. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईत उपचार करण्यात आले.

दरम्यानच्या काळात राजकीय दबावातून जळगावची हिट अँड रनची जास्त गंभीर केस दाबण्याचा प्रयत्न झाला. परंतु, पोलिसांनी अखेरला कठोर कारवाई करत अर्णव कौल आणि अखिलेश पवार या दोघांनाही ताब्यात घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्ट सूचनांनंतर जळगावच्या केस मध्ये पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वतः सूत्रे ताब्यात घेऊन तपास काम चालवले आहे.

Pune and jalgaon hit and run cases : builder and NCP connection on the forefront!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात