विशेष प्रतिनिधी
नागपूर : Priyanka Gandhi काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा आज नागपूरमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोडशो मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्याचे पहायला मिळाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा हातात घेऊन जय श्रीरामची घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमन-सामने आले होते. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारले असून तणाव निवळला आहे. Priyanka Gandhi road show in Nagpur
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी यांचा नागपूर मध्य मतदारसंघात भव्य रोड शो काढण्यात आला. प्रियंका गांधी यांचा रोड शो संपत असतानाच बडकस चौकात भाजप कार्यकर्ते तिथे आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला.Priyanka Gandhi
Rajnath : राजनाथ म्हणाले- जेएमएम म्हणजे जमकर मलाई मारो; झारखंडमध्ये 13 मुख्यमंत्री झाले, तीन तुरुंगात गेले
बडकस चौक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचा परिसर आहे. या परिसरात प्रियांका गांधींच्या रोड शोला विरोध दर्शविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाचे झेंडे दाखवत निदर्शने करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी इमारतीवरूनही पक्षाचे झेंडे दाखवले. रॅलीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी भारत माता की जय…वंदे मातरम अशी घोषणांबाजी केली. तसेच त्यांनी भाजप उमेदवारांचे पोस्टरही झळकावले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण नियंत्रणात राहिले आणि तणाव निवळला.Priyanka Gandhi
पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
प्रियांका गांधी कालपासून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सभा घेत आहेत. शिर्डी, कोल्हापूरनंतर रविवारी प्रियांका गांधी यांची सभा आरएसएसचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये होती. तत्पूर्वी रोड शोमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी घुसून राडा केल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळे काही वेळ त्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App