2024 च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका तोंडावर आले असताना त्याची तयारी करणे राहिले लांब, पण 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार कोणी आणि कसे पाडले??, यावरच महाराष्ट्राच्या राजकारणात भांडण सुरू झाले आहे. याला कारणीभूतच अर्थातच स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांचे एक वक्तव्य ठरले आहे. Prithviraj chavan targets sharad pawar over pulling down his government, but pawar kept silence, others are upset!!
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 मध्ये आपल्या सरकारची एक “विशिष्ट” आठवण सांगितली. आपण त्यावेळी मुख्यमंत्री या नात्याने मराठा समाजाला 16 % आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. पण नेमका त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आपले सरकार पाडले आणि तो निर्णय मागे पडला. देवेंद्र फडणवीसंनी 12 % आरक्षण फक्त दिले आणि ते हायकोर्टापर्यंतच टिकले. आपले सरकार वाचले असते आणि 2014 नंतर देखील काँग्रेस – राष्ट्रवादी एकत्र लढून पुन्हा सरकार आणले असते, तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
पण तेवढाच दावा करून पृथ्वीराज चव्हाण थांबले नाहीत, तर त्यांनी त्यापुढे जाऊन आपले सरकार कोणी आणि का पाडले??, याचा सविस्तर खुलासा केला. सहकार क्षेत्रात काही कडक निर्णय घेतले. म्हणजेच राज्य सहकारी बँकेचे प्रशासक संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चिडले आणि त्यांनी आपले सरकार पाडले, असा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा केला.
अर्थातच पृथ्वीराज चव्हाण यांचा सर्व दोषारोप हा थेट शरद पवारांवर होता. त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होती आणि शरद पवारांचे पक्षावर पूर्ण नियंत्रण होते. राज्य सहकारी बँकेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पूर्ण वर्चस्व होते. त्यामुळे बँकेतले सर्व व्यवहार अथवा गैरव्यवहार याला जबाबदार शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसच राहिली होती. रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेच्या व्यवहारांवर ताशेरे ओढले होते. बँक तोट्यात कशी आणि का गेली??, याविषयी ठळक प्रश्नचिन्ह लावली होती. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे सहकारी बँक राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. तो त्यांनी चोख अंमलात आणला होता. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कोर्टात खटले दाखल झाले त्यांच्याविरुद्ध 420, 120 ब वगैरे फसवणुकीची कलमे लागली.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व पूर्ण सटपटले होते. शरद पवार एवढे अस्वस्थ झाले होते की, काही फायलींवर सह्या करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय का??, असा खालच्या पातळीवरचा सवाल त्यावेळी शरद पवारांनी केला होता. पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यातील राजकीय जुगलबंदी तेव्हा जोरात रंगली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्णयामुळे शरद पवार प्रचंड अस्वस्थ झाले होते. ते त्यावेळी दुसरे काही करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचा पाठिंबा मुदतीआधी काढून घेऊन सरकार पाडले.
– जखमेवर मीठ चोळले
पण पवारांच्या या निर्णयाचा 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीलाच प्रचंड फटका बसला. विधानसभेत फक्त 41 आमदार निवडून येऊन राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या या घसरलेल्या परफॉर्मन्स साठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या “राजकीय कर्तृत्वाला” “जबाबदार” धरले होते. तो सल आजही पवारांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात कायम आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 ची आठवण काढून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनातली ती सल पुन्हा उघडी केली. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या जखमेवर मीठ चोळले.
वास्तविक या सगळ्या प्रकारात पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट शरद पवारांना टार्गेट केले, पण पवार मात्र यावेळी “सूचक मौन” बाळगून बसले. पृथ्वीराज चव्हाण यांचा वार पवारांवर होता, पण त्यांचे सध्या त्यांच्याबरोबर नसलेलेच अनुयायी त्यामुळे बेजार झाले!! सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि त्यानंतर सध्या भाजपमध्ये असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे तीन नेतेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर संतापले. पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य या तीन नेत्यांनी खोडून काढले, पण या तीन नेत्यांच्या वक्तव्यांमधला लसावि किंवा “कॉमन फॅक्टर” काढला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घसरलेल्या परफॉर्मन्सचे “क्रेडिट” पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकीय कर्तृत्वालाच त्यांनी एक प्रकारे दिले.
कारण या तिघांनीही पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसच्या नेतृत्वाने सुपारी देऊन महाराष्ट्रात पाठविले होते. त्यांनी ती सुपारी पूर्ण केली आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची घसरण झाली, असा आरोप केला. याचा अर्थच पृथ्वीराज चव्हाण यांचे शरद पवारांवर वार, पण इतरच बेजार असा ठरला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App