विशेष प्रतिनिधी
शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डीत येऊन माजी कृषीमंत्री शरद पवारांचे आकड्यासकट वाभाडे काढले. कुठे साडेतीन लाख कोटी रुपये आणि कुठे साडेतेरा लाख कोटी रुपये??, असे सांगत शरद पवारांनी आपल्या कृषिमंत्री पदाच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांना फक्त 3.50 लाख कोटी रुपये किमान आधारभूत किंमत देत त्यांच्याकडून धान्य खरेदी केले, पण गेल्या 9 वर्षांमध्ये आमच्या सरकारने तब्बल 13.50 लाख कोटी रुपयांची किमान आधारभूत किंमत देऊन शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी केले, असे पंतप्रधान मोदींनी शिर्डीतल्या शेतकरी मेळाव्यात सांगितले. Prime Minister Modi took a dig at former Agriculture Minister Sharad Pawar in Shirdi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीमध्ये 14000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. त्यानंतर मोदींनी शेतकरी मेळाव्याला संबोधित केले.
महाराष्ट्रात सध्या शरदनिष्ठ राष्ट्रवादीने छुपा पाठिंबा दिलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे वारे वाहत आहेत. मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. रोहित पवारांनी आज अन्नत्याग आंदोलन करून त्यांना पाठिंबा दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारांवर तोफ डागली आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिर्डीतल्या भव्य शेतकरी मेळाव्याला संबोधित केले. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने नेमके काय केले??, याचा याची सविस्तर माहिती पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून दिली.
शेतकरी उत्पादनांच्या वेगवेगळ्या कृषी मूल्याच्या आधारभूत किमतीत केंद्र सरकारने दीडपट ते दुप्पट वाढ केली, असे नमूद करून पंतप्रधान मोदी म्हणाले, “आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याने कायम शेतकऱ्यांच्या जीवावर आणि नावावर राजकारण केले. मी व्यक्तिगत पातळीवर त्यांचा सन्मान करतो पण त्यांनी आपल्या कृषिमंत्री पदाच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांसाठी काय केले तर, त्यांनी फक्त 3.50 लाख कोटी रुपयांची किमान आधारभूत किंमत देऊन शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी केले. पण आमच्या 9 वर्षांच्या कारकिर्दीत आमच्या सरकारने तब्बल 13.50 लाख कोटी रुपये किमान आधारभूत किंमत देऊन शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी केले. हा मागच्या आणि आमच्या सरकारमधला महत्त्वाचा फरक आहे.
आमचे सरकार भारतातल्या छोट्या शेतकऱ्याचे हित जपण्यासाठी अग्रेसर आहे. पण त्यांच्या सरकारच्या काळात लाख कोटी रुपयांचे आकडे फक्त घोटाळ्यांच्या बाबतीत ऐकायला मिळत होते. आता मात्र लाख कोटी रुपयांचे आकडे किमान आधारभूत किंमत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा रक्कम याविषयी ऐकायला मिळत आहेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
शिंदे – फडणवीस सरकारने नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेपैकी 1750 कोटी रुपयांचा पहिला हप्ता पंतप्रधान मोदींच्या हस्ते तब्बल 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
https://youtu.be/FHhZqbuQKNA
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App