विशेष प्रतिनिधी
पुणे : पोलीस असल्याची बतावणी करीत तब्बल एसटीने प्रवास करीत असलेल्या कुरिअर कर्मचाऱ्यांकडील १ कोटी १२ लाख ३६ हजारांचा ऐवज लुटणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ९२ लाख रुपयांची रोकड आणि सोने हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली. Pretending to be the police, the gang who looted 1.25 crore arrested
ही घटना दौंड तालुक्यातील पाटस येथील ढमाले वस्तीजवळ मंगळवारी मध्यरात्री घडली होती. रामदास भोसले, तुषार तांबे आणि भारत बांदल अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी एक मोटार कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली.
निलंगा – भिवंडी या एस. टी. मधून कुरियर सर्व्हिस करणारे हितेंद्र जाधव ( वाघोशी , ता. फलटण ) विकास बोबडे , तेजस बोबडे , संतोष बोबडे (तिघे रा. फलटण , जि. सातारा ) हे चौघे प्रवास करीत होते.त्यांच्याकडे १ कोटी १० लाख रुपये रोख आणि दिडशे ग्राम मेटल होते. एसटी पाटस येथील ढमालेवस्ती परिसरात राञी एक वाजण्याच्या सुमारास आली असता या एसटीला चौघांनी आडवल त्यांच्या हातात काठ्या , खाकी पैंट परिधान केलेले आणि पायात बुट असा पेहराव असल्याने बस चालकाला पोलीस असल्याचे वाटल्याने त्याने बस थांबवली.
कंडक्टरने दरवाजा ऊघडताच या चौघांनी काठ्या आपटत पोलीस तोऱ्यात शिवीगाळ करुन कुरियरवाले कोण आहे विचारले. तेव्हा बस मध्ये पाठीमागे बसलेले चौघे ऊठले. त्यांच्या शर्टच्या कॉलर पकडत त्यांना एसटी मधून बाहेर काढले आणि एसटी चालकाला जायला सांगितले. एसटी गेल्यावर या चौघांना मारहाण करीत त्यांच्याकडील रक्कम आणि मेटल हिसकावून घेतले आणि दोन दुचाकी वाहनावावरुन चोरटे पळून गेले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App