President of India visits Raigad fort : भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (6 डिसेंबर 2021) महाराष्ट्रातील रायगड किल्ल्याला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. President of India visits Raigad fort and paid tributes to Chhatrapati Shivaji Maharaj
वृत्तसंस्था
रायगड : भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (6 डिसेंबर 2021) महाराष्ट्रातील रायगड किल्ल्याला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण स्वतःला भाग्यवान समजतो, असे राष्ट्रपती म्हणाले. ही भेट त्यांच्यासाठी तीर्थयात्रासारखी आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रपती म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या सक्षम नेतृत्वाखाली संपूर्ण प्रदेशाची शान वाढली तर देशभक्तीची भावना पुन्हा उफाळून आली. 19व्या शतकातील संस्कृत ग्रंथ ‘शिवराज-विजय’मध्ये शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अतिशय प्रभावीपणे वर्णन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, या पुस्तकाचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर केले जाऊ शकते जेणेकरून लोकांना, विशेषतः तरुण पिढीला शिवाजी महाराजांच्या महान व्यक्तिमत्त्वाची आणि अद्वितीय कार्याची ओळख व्हावी.
राष्ट्रपती म्हणाले की, छत्रपती शिवरायांची विचारसरणी भविष्यवादी होती. ‘अष्ट-प्रधान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या मंत्रिमंडळाच्या मदतीने त्यांनी दूरगामी परिणाम करणारे अनेक निर्णय घेतले. भारतातील पहिले आधुनिक नौदल छत्रपती शिवाजी यांनी बांधले, असेही त्यांनी नमूद केले.
तत्पूर्वी, भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे सकाळी पुणे विमानतळावर भारतीय वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने आगमन झाले. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कमांडन्ट ले. जनरल पी. पी. मल्होत्रा (व्हीएसएम), एअर कमोडोर एच. अस्सुदानी (व्हीएम, व्हीएसएम, एओसी, नं.2 विंग, इंडियन एअरफोर्स स्टेशन पुणे) यांनी त्यांचे स्वागत केले.
President of India visits Raigad fort and paid tributes to Chhatrapati Shivaji Maharaj
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App