विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी त्यांच्यात ठरलेल्या जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने मविआच्या नेत्यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे.Prakash Ambedkar’s letter to Mahavikas Aghadi, announce seat allotment decision in two days
काँग्रेसची 22 फेब्रुवारीला पत्रकार परिषद झाली. ती आम्ही बघितली. यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये 39 जागांवर एकमत झाले असून, लवकरच 27 किंवा 28 फेब्रुवारीला औपचारिक आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले होते. दोन दिवसांच्या आत त्यांच्या जागासंदर्भात माहिती द्यावी, म्हणजे आम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल, असे वंचित पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
वंचित आघाडीने लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?
वंचित बहुजन आघाडीने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची 22 फेब्रुवारीला पत्रकार परिषद झाली. ती आम्ही बघितली. यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये 39 जागांवर एकमत झाले असून, लवकरच 27 किंवा 28 फेब्रुवारीला औपचारिक आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले होते.
वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चेन्नीथला म्हणाले होते की, काँग्रेसने किमान समान कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तावित 39 कलमी अजेंडा स्वीकारला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून जागांची मागणी अद्याप आलेली नाही.
किमान समान कार्यक्रमासाठी आमच्या प्रस्तावित 39-पॉइंट अजेंडावर काँग्रेसने स्वीकारल्याचे आम्ही स्वागत करतो. आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना किमान समान कार्यक्रमासाठी त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप-आरएसएसचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी मविआतील तिन्ही पक्षांच्या मसुद्यासह एक किमान समान कार्यक्रम तयार करणे महत्त्वाचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App