विशेष प्रतिनिधी
जळगाव : मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. पण आताच्या या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील. त्यामुळे तो मांडणार नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी जळगाव येथे बोलताना केला आहे. Prakash Ambedkar said- I have the formula of Maratha reservation But won’t tell
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे. पण आताच्या या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील. त्यामुळे मी त्यांच्यापुढे हा उपाय मांडणार नाही. नवा सत्ताधारी येऊ द्या. त्यानंतर मी त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कसा हाताळायचा हे सांगेन.
प्रकाश आंबेडकर – रोहित पवारांची “अदृश्य शक्तीची” एकच भाषा; फडणवीसांवरच वेचक – वेधक निशाणा!!
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला. अॅडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाचा यशस्वीपणे हाताळला. पण त्यानंतरही तत्कालीन सरकारने कुंभकोणी यांना पुढे काम करू दिले नाही. त्यांना या खटल्यात लक्ष घालू नका, हजर राहू नका असे आदेश देण्यात आले. असे का? गिरीश महाजन यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.
नागपुरात लोकशाहीचा तमाशा सुरू
यावेळी त्यांनी विधिमंडळ अधिवेशनावर निशाणा साधताना हा लोकशाहीतील तमाशा असल्याचा आरोप केला. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्याचे वाटत नाही. तिथे सत्ताधारी कोण अन् विरोधक कोण हेच समजत नाही. जे मुद्दे सत्ताधारी पक्षाने मांडले पाहिजेत, ते मुद्दे विरोधक मांडत आहेत आणि जे मुद्दे विरोधकांनी मांडले पाहिजेत ते मुद्दे सत्ताधारी मांडताना दिसून येत आहेत. असा लोकशाहीचा तमाशा तिथे सुरू आहे. राज्यापुढे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. पण त्यावर कोणतीही चर्चा होत नाही. विशेषतः पीकविम्याच्या मुद्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काँग्रेसने भाजपवर पक्ष फोडण्याचा आरोप केला. पण भाजपने नवे काहीच केले नाही. काँग्रेसनेही यापूर्वी अनेक पक्ष फोडले. त्यांनी आमच्यासोबत हेच केले होते. काँग्रेसने जे केले तेच भाजप करत आहे, असेही प्रकाश आंबेडकर यावेळी काँग्रेसवर शरसंधान साधताना म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App