Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची टीका : पवार हे केवळ मराठ्यांचे नेते, ते मराठ्यांनाच उच्चपदी बसवतात, जरांगेंच्या आंदोलनामुळे हे उघड!

Prakash Ambedkar

विशेष प्रतिनिधी

सांगली : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि आंदोलनामुळे शरद पवारांचे मराठा प्रेम उघड झाले आहे. शरद पवार हे केवळ मराठ्यांचे नेते आहेत, राजकारणात उच्चपदी ते मराठ्यांना विराजमान करतात यावरही शिक्कामोर्तब झाल्याचे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  ( Prakash Ambedkar  ) यांनी म्हटले.

मराठा आंदोलनाला अथवा आरक्षणासंदर्भात मागची २ वर्षे शरद पवार हे उत्तर देण्यास शिताफीने टाळून आपली छबी पुरोगामी म्हणून मिरवत होते, परंतु त्यांच्या रत्नागिरी दौऱ्यात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट झाला आहे. जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे गरीब मराठ्यांना न्याय मिळणार नाही आणि हीच भूमिका शरद पवारांची असून ही एक समानता दिसत आहे. मराठवाड्यात जरांगे विरुध्द ओबीसी असा उघड तीव्र संघर्ष सुरू झाला आहे, परंतु उर्वरित महाराष्ट्रात त्याची तीव्रता जाणवत नाही. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीनंतर मराठा आंदोलकांना बऱ्यापैकी यश मिळाले तर मराठ्यांची घुसखोरी होईल आणि ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येईल अशी सर्वांची धारणा आहे.



जरांगेंनी विधानसभेत उमेदवार द्यावेत

उद्धव ठाकरेंनीदेखील ओबीसी कोटा वाढवून त्यातून मराठ्यांना आरक्षण द्यायची मागणी केली आहे. आता आपल्या मनातील सुप्त इच्छा शरद पवार हे या माध्यमातून पूर्ण करतील. म्हणूनच उद्धव ठाकरेंची साथ पवारांना हवी आहे. विधानसभा निवडणुकीत जरांगेंनी आपले अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात न उतरवल्यास ते शरद पवारांच्या इशाऱ्यावर राजकारण करतात हे उघड होईल.

Prakash Ambedkar criticizes Sharad Pawar Over Maratha Reservation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात