प्रतिनिधी
मुंबई : प्रशासकीय बदल्यांसंदर्भात राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. बदल्यांसाठी प्रयत्न करणाऱ्या किंवा बदल्यांच्या प्रतिक्षेत असलेल्यांना आता काही दिवस वाट पहावी लागणार आहे. कारण ३० जूनपर्यंत राज्यात एकही सरकारी बदली करू नये, असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. त्यामुळे आता जूनच्या अखेरपर्यंत राज्यात एकही प्रशासकीय बदली होणार नाही. अगदीत तातडीच्या कारणास्तव बदली असेल तर ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने केली जाणार असल्याचे राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. नाराज आमदारांच्या खुशीसाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे मानण्यात येत आहे. Postponement of administrative transfers till June 30; CM’s decision for the happiness of MLAs !!
Governor Koshyari letter to CM Thackeray : मुख्यमंत्र्यांची भाषा धमकीवजा, अपमान करणारी, राज्यपालांचं पत्र अखेर समोर आलं
बदल्यांना स्थगिती
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बदल्या न झालेले कर्मचारी बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु या सर्व कर्मचाऱ्यांना बदल्यांसाठी आणखी एक महिना वाट पहावी लागणार आहे. दरवर्षी मे महिन्यात राज्य सरकारच्या अनेक प्रशासकीय विभागांमधील बदल्या होतात परंतु कोरोनामुळे या बदल्या गेली दोन वर्ष झाल्या नव्हत्या त्यामुळे ३० जून नंतर तरी हव्या असलेल्या ठिकाणी बदल्या होणार का याकडे अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार करण्यात येणाऱ्या बदल्या २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षी ३०जून २०२२ पर्यंत करण्यात येऊ नयेत. परंतु प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने करावी, असे राज्य सरकारच्या परिपत्रकात नमूद केलेआहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App