नवनीत राणा अटक : राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई पोलिस महासंचालकांना दिल्लीत पाचारण


प्रतिनिधी

नवी दिल्ली : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांच्याकडून लोकसभेच्या हक्कभंग समितीत या कारवाई विरोधात तक्रार करण्यात आली होती. आता या समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबईचे पोलिस महासंचालक यांना आता दिल्लीत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Navneet Rana arrested: Chief Secretary of State and Director General of Mumbai Police summoned to Delhi

15 जून रोजी हजर राहण्याचे आदेश

मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य हे मुंबईत दाखल झाले होते. या मुद्द्यावरुन शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. यावेळी कोठडीत आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेच्या हक्कभंग समितीकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच मुंबई पोलिस महासंचालक संजय पांडे यांना या समितीपुढे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या दोघांनाही आता 15 जून रोजी समितीसमोर हजर राहावे लागणार आहे.

याच संदर्भात नवनीत राणा यांची साक्ष या समितीकडून 23 मे रोजी नोंदवण्यात आली होती. यामध्ये त्यांनी ज्या अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर आरोप केले होते त्यांना आता चौकशीसाठी या समितीपुढे हजर राहावे लागणार आहे.

Navneet Rana arrested: Chief Secretary of State and Director General of Mumbai Police summoned to Delhi

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था