राज्यसभा निवडणूक : संभाजीराजांचे गणित जुळेना, माघारीची आक्रमक तयारी!!; पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष


प्रतिनिधी

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावून महाविकास आघाडीची एकजूट दाखवली. त्यानंतर आपले राजकीय मतांचे गणित जुळत नाही असे समजून संभाजी राजे छत्रपती आता राज्यसभा निवडणुकीतून अपक्ष उमेदवार म्हणून माघार घेण्याची तयारी चालवल्याची बातमी आहे. Sambhaji Raja’s maths did not match, aggressive preparation for withdrawal

स्वतः संभाजीराजे आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघात सकाळी 11.00 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. सर्वच प्रस्थापित नेत्यांच्या राजकीय पक्षांनी थेट पाठिंबा देण्याचे टाळले नंतर संभाजी राजे या नेत्यांविषयी काय भूमिका म्हणतात याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे त्यांच्या समर्थकांनी आक्रमकपणे एक व्हिडिओ जारी करत संभाजी राजे कोणाला सोडणार नाहीत, असा इशारा दिला आहे. परंतु, हा सर्व भाग त्यांच्या दीर्घकालीन राजकारणाचा असू शकतो. पण सध्या मात्र संभाजीराजे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनुमोदक म्हणून देखील आमदारांच्या संख्येची जुळवाजुळव करता आलेली नाही असे दिसते आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याखेरीज करीत पर्याय नसल्याने ते पत्रकार परिषदेत नेमके काय बोलतात याची उत्सुकता महाराष्ट्रात लागली आहे.

संजय राऊत आणि संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावून हे तिन्ही पक्ष एकत्र असल्याचा राजकीय संदेश महाराष्ट्रात पोचवला आहे. अशा स्थितीत संभाजीराजे यांचे राज्यसभा निवडणुकीच्या मतांचे गणित अधिकृत पातळीवर तरी जमत नाही हे लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी आता अर्ज भरण्यापूर्वी आधार घेण्याची तयारी चालवण्याची बातमी संभाजीराजे यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली आहे. मराठी माध्यमांनी या बातम्या याच सूत्राच्या आधारे चालवल्या आहेत.

मात्र, राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेच्या निमित्ताने जे राजकारण घडले त्याचा राजकीय सिक्वेन्स पाहता संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करून नेमके काय मिळवले?? त्यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करण्यामागे नेमके कोण होते?? हा प्रश्न तयार होतो आहे. स्वतः शरद पवारांनी राष्ट्रवादीची जादा मते देण्याचे आश्वासन संभाजीराजे यांना दिले होते. परंतु शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अथवा पुरस्कृत उमेदवार होण्याची त्यांची तयारी नसल्याने अखेरीस त्यांना माघार घेण्याखेरीज पर्याय उरला नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

– माघारीची तयारी आक्रमक

संभाजीराजे यांच्या समर्थकांनी तसेच स्वतः संभाजीराजे यांनी या माघारीची तयारी देखील आक्रमक पद्धतीने केल्याचे दिसून आले. आता राज्यसभा नाही ही तर पूर्ण राज्य ताब्यात घेणार अशी पोस्टर्स संभाजीराजे यांच्या समर्थकांनी आधीच व्हायरल केली होती. संभाजीराजे यांनी आज सकाळीच ट्विट करून आपली वैचारिक बांधिलकी छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे आणि आपण फक्त जनतेला बांधील राहू, असे जाहीर करून एक प्रकारे पक्षीय राजकारणापासून आपण दूर असल्याचे स्पष्ट केले होते.

त्याचबरोबर राज्यसभेचे गणित जुळले नाही तरी दीर्घकालीन राजकारणामध्ये आपला नक्कीच वाटा राहील असे देखील यातून संभाजीराजे यांनी सूतोवाच केल्याचे मानले जात आहे. पत्रकार परिषदेत संभाजीराजे कोणत्या अधिकृत भूमिका जाहीर करतात?, याकडे देखील महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Sambhaji Raja’s maths did not match, aggressive preparation for withdrawal

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती