छगन भुजबळांच्या घरासमोर असे अनोखे आंदोलन केल्याने अंबड पोलिसांमध्ये कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे Police in riot gear stormed a rally on Friday, removing hundreds of protesters by truck.
विशेष प्रतिनिधी
नाशिक : छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील घरासमोर भल्या पहाटे चक्क निषेधाची काळी रांगोळी काढण्यात आली आहे.‘भुजबळ फार्म’ बाहेर हा प्रकार घडलाय. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पोलीस बंदोबस्तातही वाढवला आहे.छगन भुजबळांच्या घरासमोर असे अनोखे आंदोलन केल्याने अंबड पोलिसांमध्ये कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंदोलनाचे कारण काय आहे ?
महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठाच्या कायद्यामध्ये सुधारणा केली आहे.दरम्यान या माध्यमातून प्र. कुलपती हे नवीन पद तयार करण्यात आले आहे. तर कुलपतींचे अधिकार उच्चतंत्रशिक्षण मंत्री यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यापीठे राजकारणांचा अड्डा बनतील, असा विरोधकांचा आरोप आहे.
दरम्यान या विधेयकाला भाजपचा विरोध आहे. त्याचाच भाग म्हणून भारतीय युवामोर्चा युवती विभागाने भुजबळांच्या घरासमोर काळी रांगोळी काढून निषेध नोंदवल्याचे समजते.विद्यापीठ विधेयकाला विरोध म्हणून आतापर्यंत मुख्यमंत्र्यांना 10 लाख पत्र पाठवली आहेत. तसेच उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना मेसेज, ई-मेल आणि मिस कॉल्स देऊन आंदोलन केले आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस ऋषीकेश आहेर, शहर युवती प्रमुख साक्षी दिंडोरकर, हरीश दिंडोरकर, स्वाती माळोदे, मयुरी शुक्ल, लीना मोरे यांना पोलिसांना ताब्यात घेतल्याचे समजते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more