विशेष प्रतिनिधी
अंधेरी – शरीरसौष्ठवपटू मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अभिनेता साहिल खानसह जुनेद कालिवाला, रुबल दंडकर आणि राज फौजदार यांच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. लवकरच या चौघांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार असून त्यानंतर अटकेची कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. Police booked actor sahil khan and four others
जोगेश्वरी येथील रहिवासी असलेला मनोजने शरीरसौष्ठव स्पर्धेतील ‘मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पिशियनशिप’ हा किताब पटकाविला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचा अभिनेता साहिल खानसोबत वाद सुरू होता. याच वादातून मनोजने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. साहिलकडून वारंवार धमक्या दिल्या जात असल्याने मनोज गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होता. त्यातून मनोजने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सध्या मनोजवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
मनोजने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये साहिलवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी मनोजने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी अभिनेता साहिल खान, त्याचे तीन सहकारी रुबल दंडकर, राज फौजदार आणि जुनेद कालिवाला या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, सोशल मीडियावर बदनामी करून धमकी देणे आदी प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App