
PM Modi interact With Pune Farmer : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध क्षेत्रांतील व्यक्तींची ऑनलाइन भेट घेतली. यावेळी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील शेतकरी बाळू नाथू वाघमारेंनाही संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाघमारेंशी मराठीतून संवाद साधून त्यांच्या शेतीची माहिती घेतली. बाळू नाथू वाघमारे हे जैविक खतांचा वापर आपल्या शेतीत करतात. त्यांनी जैविक खतांमुळे होत असलेल्या फायद्यांची पंतप्रधानांना माहिती दिली. पंतप्रधानांच्या प्रश्नांना वाघमारेंनीही उत्तरे दिली. यावेळी वाघमारे कुटुंबातील महिला सदस्यही उपस्थित होते. या महिला शेतकऱ्यांनाही पंतप्रधानांनी प्रणाम करत कोरोना काळात काळजी घेण्याचे आवाहन केले. PM Modi interact With Pune Farmer On World Environment Day bio farming
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईकरांना दिलासा : सोमवारपासून सर्वसामान्यांसाठी पुन्हा धावणार बसेस, फेस मास्क घालणे अनिवार्य
- स्वागतार्ह : ऑनलाइन शिक्षणात खंड पडू नये म्हणून नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, नेटपॅकसाठी 35 हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1 हजार रुपये
- नागपुरात अभिनेता संजय दत्तने नितीन गडकरींची भेट घेतली, पदस्पर्श करून घेतला आशीर्वाद
- जम्मू कश्मीर : पुलवामातील त्रालच्या बस स्टँडवर CRPF पथकावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 7 जण जखमी, शोध मोहीम सुरू
- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अनलॉक मॉडेलचे उद्योगपतींकडून कौतुक, देशभर राबविण्याचे केले आवाहन