विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेतही कोणी विनामास्क दिसला, गर्दी केली किंवा पत्रकारांनी मास्क घातला नसल्यास धमकावतात. मात्र, त्यांच्या पक्षाचेच नेते गर्दी जमवत आहे. बदलापुरात तर लहान मुलांची गर्दी जमवून त्यांच्या जीवाशी खेळ खेळण्यात आला.Playing with children’s lives by gathering crowds from NCP leaders
ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सरकारने निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. बदलापुरात मात्र राष्ट्रवादीने लहान मुलांची गर्दी जमवत ख्रिसमसचा कार्यक्रम साजरा केल्याची बाब समोर आली आहे. या कार्यक्रमात झालेली लहानग्यांची प्रचंड गर्दी पाहून लहान मुलांच्या जिवाशी कसा खेळ सुरू आहे,
हे पाहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया लोक व्यक्त करू लागेल आहेत. मुलांच्या या गदीर्चा व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे.राज्यात आणि संपूर्ण देशभरात ओमिक्रॉन विषाणूचं संकट पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली आहे. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा राज्यात नाईट कर्फ्यू आणि इतर निर्बंध लावायला सुरुवात केली आहे.
यामागे गर्दी होऊ नये आणि ओमीक्रॉंन विषाणूचा फैलाव होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं लहान मुलांसाठी ख्रिसमसचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात शेकडो लहान मुलांची गर्दी झाली होती.
त्यातच स्टेजवर असलेल्या सांताक्लॉजने लहान मुलांच्या दिशेनं भेटवस्तू आणि चॉकलेट्स फेकायला सुरुवात केल्यानंतर तर लहान मुलांमध्ये अक्षरश: झुंबड पाहायला मिळाली. याचा व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे.
आधीच लहान मुलांचं लसीकरण झालेलं नसल्यानं त्यांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका असताना बदलापुरात राष्ट्रवादीकडूनच लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App