वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईचे निवृत्त पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने मंगळवारी अटक केली. सेबी नियमांचे उल्लंघन आणि स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदा टॅप केल्याप्रकरणी प्रामुख्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याच प्रकरणात ईडीने चित्रा रामकृष्णन यांना पूर्वी अटक केलेली आहे. विशेष म्हणजे पांडे यांनी मंगळवारीच दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते ईडीसमोर हजर झाले होते. पांडेंवर सीबीआयनेही गुन्हा दाखल केला होता. शिवाय त्यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणातही आरोप आहेत.Phone tapping case of NSE employees: Retired Mumbai Police Commissioner Sanjay Pandey arrested by ED
यापुर्वीही चौकशी
गत आठवड्यातदेखील ईडीने संजय पांडे यांची चौकशी केली होती. नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणात आधी त्यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत.
फोन टॅपींगचा आरोप
संजय पांडे यांनी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात आज तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दरम्यान एनएसई घोटाळ्याप्रकरणी संजय पांडे यांच्या कंपनीचा समावेश असल्याचे आरोप त्यांच्यावर होते. त्यांच्यावर फोन टॅपींग केल्याचेही आरोप आहेत. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय कडून चौकशी करण्यात आली. यानंतर ईडीने आज त्यांना अटक झाली.
पांडे यांच्यावरील आरोप
संजय पांडे यांच्यावर एनएसई कर्मचाऱ्यांचे कॉल अवैधपणे रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. 2009 ते 2017 दरम्यान NSE कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा आरोप आयएसईसी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने पांडेंना 4.45 कोटी रुपये दिल्याचे तपासातून पुढे आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App