- राम जन्मभूमी भूमिपूजनानंतर अयोध्येत विकासाची पहाट, वर्षभराच्या आतच अयोध्येचे रूप पालटायला सुरवात
- कोरोनाकाळातही दररोज 20 हजार पर्यटकांचा वावर
विशेष प्रतिनिधी
अयोध्या : राम जन्मभूमी मंदिराचा निकाल अनुकूल लागला. मंदिराचे भूमिपूजन दिमाखात संपन्न झाले आणि विकासाचा “रामबाण” लखनौतून अयोध्येच्या दिशेने सुटला आहे. वर्षभराच्या आतच अयोध्येत विकासाची पहाट उगवली आहे. अयोध्या आणि परिसरात विकासाच्या १३६ मोठ्या प्रकल्पांचे दणक्यात सुरू झाले आहे.(ayodhya lamp lighting) कोरोना काळातही दररोज २० हजार पर्यटक अयोध्येत येत आहेत. जमिनींचे भाव १० पट वाढले आहेत. रोजगाराचे आकडे नवनवी शिखरे गाठत आहेत.
पूर्वी अयोध्येतील लोक म्हणत, रामाच्या आधी पोटासाठी भाकरी पण गरजेची आहे. आता येथे रामाबरोबर भाकरीही स्थानिकांबरोबर बाहेरच्या लोकांनाही पोटभर मिळायला लागली आहे. रामलल्ला विराजमानच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊन ९ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होईल. यानंतर अयोध्येत खूप मोठे बदल होत आहेत. पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक पदरी मार्ग दुपदरी झाले आहेत. अनेक चौपदरी मार्गांचे काम प्रगतीपथावर आहे. ayodhya lamp lighting
आधी पायाभूत सुविधा असोत की इतर सर्व प्रकल्प लखनऊजवळच व्हायचे. आता मात्र विकास प्रकल्पांची दिशा अयोध्येकडे सरकली आहे. आधी अयोध्येत भूखंड बिस्वानुसार विकले जायचे. एक बिस्वा म्हणजे १३६१ चौरस फूट. आता भूखंड मोठ्या शहरांप्रमाणे चौरस फुटात विकले जात आहेत. हा मोठा बदल वर्षभराच्या आत घडला आहे. ayodhya lamp lighting
शहरातील जमिनीचे दर १० पट तर ग्रामीण भागातील जमिनीचे दर ५ पट वाढले आहेत. आधुनिक शहरांप्रमाणे वीज तारा भूमीगत करण्यात आल्या. शहरातून जाणारी उच्च दाब वाहिनी शरयूच्या पलिकडून नेण्यात आली आहे. या कोरोना काळातही रोज सरासरी २० हजार पर्यटक अयोध्येत येत आहेत. आधी पर्यटनाच्या हंगामात दररोज २ हजार पर्यटक – भाविक यायचे. पर्यटकांच्या संख्यावाढीचा सकारात्मक परिणाम दिसला. पर्यटक वाढल्याने कोरोना काळातही स्थानिक लोक बेरोजगार झाले नाहीतच. उलट बाहेरच्या लोकांनाही रोजगार नव्याने उपलब्ध झाला. अयोध्याचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा सांगतात की, वैद्यकीय महाविद्यालय असो की रस्ता रुंदीकरण, राम की पौडी, गुप्तार घाट यांचा विकास करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. ayodhya lamp lighting
रामजन्मभूमी ट्रस्टचे विश्वस्त कमलेश्वर चौपाल सांगतात, पुरातन वारसा टिकवून ठेवण्याकडे आमचे लक्ष राहीलच. मात्र, आधुनिक काळाच्या दृष्टीने लोकांची संख्या व सुविधांकडे लक्ष द्यावे लागेल. हिंदू- मुस्लिम तणावाशिवाय प्रेमाने अयोध्येत राहतात हे संपूर्ण जगाला समजले आहे. आज देशातील प्रत्येक उद्योगपतीला अयोध्येत व्यवसाय करायचा आहे. व्हेटिकन सिटी किंवा मक्काचे रुप बदलले नाही का? देशात आलेल्या परदेशी पर्यटकांना ऊर्जा मिळायला हवी. सुविधा मिळाव्यात. गर्दीमुळे अनेक ठिकाणी विचित्र घटना घडल्या, त्या थांबवल्या जाव्यात.
ayodhya lamp lighting
सध्याची २० हजार पर्यटकांची संख्या मंदिर झाल्यानंतर १० लाखांवर जाईल. तणावामुळे अयोध्येतील डॉ. योगेंद्र लखनऊला निघून गेले होते. त्यांचे वडिलोपार्जित घर अयोध्येत आहे मात्र ते पडून आहे. ते त्यांना विकायचे होते. मात्र, गिऱ्हाईक येत नव्हते. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी मंदिराच्या बाजूने निकाल आल्याने आता घर खरेदीसाठी चौकशी होऊ लागली आहे. काही दिवसांनंतर त्यांच्या घराला दुप्पट किंमत द्यायला लोक तयार झाले. डॉ. योगेंद्र आता त्यांच्या घराला हॉटेलमध्ये रूपांतरित करत आहेत. व्यवसायाची अयोध्येत लखनऊपेक्षा जास्त संधी असल्याने त्यांनी अयोध्येऐवजी लखनऊतील घर विकायचा निर्णय घेतला आहे. अशाच प्रकारे डॉ. व्ही. पी. पांडेंना दिल्लीतील एका प्रख्यात कार्डिओलॉजिस्टचा फोन आला. त्यांना अयोध्येत रुग्णालय बांधण्यासाठी तीन एकर जमीन हवी असल्याचे सांगितले. ही केवळ दोन उदाहरणे नाहीत. असे शेकडो जण आहेत ज्यांना अयोध्येत यायचे आहे.
एक वर्षात गुन्हेगारीही कमी
अयोध्या ठाण्याचे प्रभारी रामप्रकाश मिश्रा सांगतात की, मागील एक वर्षात अयोध्या पोलिस ठाण्याचा ग्राफ खाली आला आहे. लहानमोठ्या घटना वगळता मोठी घटना घडली नाही. मणी पर्वत भागाला नेहमीच गुन्हेगारांचा गड म्हटले जायचे. मात्र, पीएसी कॅम्पमुळे तेथेही शांतता आहे.
सामान्य व्यक्ती : 20% घरांचा भूमीवापर बदलला. 10% हॉटेल-स्टे होममध्ये रुपांतरीत. भूमीवापरासंदर्भातील कार्यवाही वेगाने केली जात आहे.
उद्योगपती : 136 मोठे प्रकल्प अयोध्या- लखनऊ महामार्गावर होत आहेत. यात 10 पंचतारांकित हॉटेल, 7 रुग्णालय, 5 शॉपिंग मॉल आहेत.
समाजकार्य : आधी ट्रस्टच्या २ धर्मशाळा होत्या. मात्र, आता देशातील मारवाडी, शीख, जैन धर्मीय लोक अयोध्येत मोठ्या प्रमाणावर जमिनी घेत आहेत.