अखेर बैलगाडा शर्यतीला मिळाली परवानगी ; गृहमंत्र्यांनी दिली पाहीली प्रतिक्रिया

तब्बल ७ वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला काही अटी आणि नियम घालून परवानगी देण्यात आली आहे. Permission was finally granted for the bullock cart race; The response given by the Home Minister


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल ७ वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला काही अटी आणि नियम घालून परवानगी देण्यात आली आहे.त्याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रासाठी हा मोठा दिलासा असल्याचे ते म्हणाले.

दिलीप वळसे पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले की ,“शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षे सुरु असलेला या खेळावर बंदी आणल्याने शेतकरी नाराज झाले होते. गेली काही वर्षे आम्ही सर्व जण बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करत होतो. आजच्या निर्णयानंतर मला खूप आनंद झाला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी वर्गाला याचा आनंद झाला आहे,”



पुढे पाटील म्हणले की , “माझी शेतकऱ्यांना विनंती आहे. सुप्रीम कोर्टाने अटी घालून परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अटीशर्थींचे पालन करुन या शर्यती भरवल्या पाहिजेत आणि आनंद घेतला पाहिजे. कुठली चुकीची गोष्ट करुन परत संकट उभे राहणार नाही याची काळजी सर्व शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे,” असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Permission was finally granted for the bullock cart race; The response given by the Home Minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात