विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे जुने जाणते साथीदार आणि मुंबईत आणि दिल्लीत पक्षाची बाजू लावून धरणारे राज्यसभेचे माजी खासदार एडवोकेट माजिद मेमन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आहे. 76 वर्षांच्या माजिद मेमन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यासाठी वैयक्तिक कारण दिले असले तरी त्यांच्या या अचानक निर्णय मागे नेमके कारण काय आहे?, याची राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळांबरोबरच बाकीच्या पक्षांच्या वर्तुळामध्ये देखील जोरदार चर्चा आहे. Pawar’s old friend Majid Memon left NCP
माजिद मेमन हे 2014 ते 2020 या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेत प्रतिनिधित्व करत होते. गेली 16 वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या राजकीय खटल्यांमध्ये त्यांनी न्यायालयात वकिली देखील केली होती. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या अनेक वकिलांपैकी ते एक वकील होते.
एक ट्विट करून माजिद मेमन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अचानक राजीनामा दिला. गेली 16 वर्षे शरद पवारांचे मला मार्गदर्शन लाभले. याविषयी मी त्यांचे आभार मानतो. परंतु वैयक्तिक कारणासाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस सोडावी लागत आहे. माझ्या सदिच्छा पक्षाच्या पाठीशी कायम राहतील, असे माजिद मेमन यांनी ट्विट मध्ये नमूद केले आहे.
माजिद मेमन हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर कोणता मार्ग चोखाळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ते एमआयएम पक्षाशी जवळीक करणार की समाजवादी पक्षात जाऊन आपले राजकीय भवितव्य सुनिश्चित करणार की अचानक वेगळीच खेळी करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सामील होणार??, अशा अटकळी राजकीय वर्तुळात बांधल्या जाऊ लागल्या आहेत. मात्र या संदर्भातला कोणताही खुलासा खुद्द माजिद मेमन यांनी केलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App