विशेष प्रतिनिधी
मुंबई/ पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपली जुनीच राजकीय जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यांनी आज पुण्यातल्या त्यांच्या 1, मोदी बाग निवासस्थानी सकाळी भाजपचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार संजय काकडे त्याचबरोबर आमदार बच्चू कडू यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा केली. एकेकाळी पवारांचे समर्थक असणारे हे नेते त्यांच्यापासून दूर गेले होते. परंतु, आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटून मूळ पक्ष अजित पवार घेऊन गेल्यानंतर पवार आपल्या जुन्या जुळवा जुळवीच्या प्रयत्नात संजय काकडे आणि बच्चू कडू यांना पुण्यात भेटले. Pawar meets kakde and kadu, Papu kalyan in Congress office
त्याचवेळी उल्हासनगर मध्ये वेगळी घडामोडी घडली. पवारांचे कट्टर समर्थक आणि सुधाकरराव नाईक यांनी मुसक्या आवळून तुरुंगात घातलेले माजी आमदार पप्पू कलानी स्वतःच्या चिरंजीवांच्या आमदारकीसाठी 32 वर्षांनी काँग्रेस कार्यालयात पोहोचले. पप्पू कलानींचे चिरंजीव ओमी कलानी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून आमदारकीचे तिकीट मागत आहेत. त्यांच्या तिकिटाची आणि निवडून येण्याची खात्री करून देण्यासाठी आणि घेण्यासाठी पप्पू कलानी यांनी उल्हासनगर मधल्या काँग्रेस कार्यालयात जाऊन तिथल्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पवारांची ही सगळी जुनी जुळवा जुळव विधानसभा निवडणुकीसाठी सुरू झालेली दिसली.
काँग्रेस मधून नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आमदार अशी सुरवात करून हत्या प्रकरणात आणि जन्मठेपेची शिक्षा झाल्याने जेलमध्ये गेलेले पप्पू कालानी आता जेलच्या बाहेर आले आहेत. त्यांचे चिरंजीव ओमी कालानी यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून उल्हासनगर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी मोर्चेबांधणी करणारे पप्पू कालानी यांनी तब्बल 32 वर्षांनी काँग्रेस कार्यालयात भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी गुफ्तगू केली.
1986 साली पप्पू कालानी हे काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.1987 मध्ये ते नगराध्यक्ष झाले. शरद पवारांनी काँग्रेसचे तिकीट दिल्यानंतर 1990 साली ते काँग्रेसचे आमदार झाले. पप्पू कालानी यांनी नेहरू चौकातील काँग्रेस कार्यालयाला शेवटची भेट ही 1992 मध्ये दिली होती. त्याच दरम्यान रिक्षा युनियनचे नेते मारुती जाधव यांच्या हत्येप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या सरकारने व पप्पू कलानी यांना टाडाखाली अटक केली. ही अटक टाळण्यासाठी शरद पवारांनी जंग जंग पछाडले होते.
पण अटक झाल्यावर काँग्रेसने पप्पू कालानी यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढले. मारुती जाधव हत्या प्रकरणात पप्पू कालानी 1992 ते 2002 असे जवळपास 10 वर्षे पुण्याच्या येरवडा कारागृहात राहिले. त्यांची जामिनावर सुटका झाल्यावर उल्हासनगरात केर आयो पप्पू शेर आयो हे गाणे गुंजले. 2002 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत पप्पू कालानी यांनी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणली.
2012 मध्ये न्यायालयाने पप्पू कालानी यांना इंदर बठीजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कोरोनाच्या काळात 70 वर्षांवरील कैद्यांना मुभा देण्यात आल्याने कालानी 2021 मध्ये जेलच्या बाहेर आले. अशात ओमी कालानी यांची पत्नी पंचम कालानी ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असतानाही ओमी यांनी कल्याण लोकसभेत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे याच्याशी दोस्ती का गठबंधन निभावताना विधानसभा निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागणार.
तिकीट मिळाले नाही तर अपक्ष उभे राहणार असे स्पष्ट केले आहे.त्यानुसार टीम ओमी कालानी यांची कोअर कमिटीची बैठक गोव्यात संपन्न झाली आहे.विशेष म्हणजे या कमिटीचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते डॉ.जयराम लुल्ला आहेत.या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही भेट दिली होती.
जेलमधून आल्यापासून पप्पू कालानी हे ओमी कालानी यांना निवडून आणण्यासाठी ऍक्टिव्ह झाले असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी 32 वर्षांनी कॉग्रेस कार्यालयाला भेट देऊन जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्याशी मोर्चेबांधणीची चर्चा केली.
यावेळी टीम ओमी कालानीचे कमलेश निकम, मनोज लासी, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्याशी विचारणा केली असता ओमी कालानी यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीत असून आम्ही एकदिलाने ओमी यांचे काम करणार आहोत. पक्षाने तिकीट मिळाले नाही आणि ओमी यांनी अपक्ष निवडून लढवली, महाविकास आघाडीने त्यांना समर्थन दिले तरी ओमी यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस प्रचारात उतरणार असल्याचे रोहित साळवे यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App