नाशिक : मुंबई हायकोर्टाच्या दणक्यानंतर शरद पवार आणि काँग्रेस यांनी केली “चालबाजी”; महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना पाडले “एकाकी”!! हे राजकारण आज महाराष्ट्रात रंगले. Pawar and Congress left thackeray alone over maharashtra bandh issue
– त्याचे असे झाले :
महाराष्ट्रात बदलापूर आणि अन्य शहरांमध्ये झालेल्या महिला आणि मुलींवरच्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने एकत्र येऊन राजकारणाचा दणका महायुतीला द्यायचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आधी बदलापुरात आंदोलन घडवून आणले. 10 तास रेल्वे बंद केली. महायुती सरकार विरोधात मोठी वातावरण निर्मिती केली.
दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे 24 ऑगस्ट रोजी शनिवारी संपूर्ण महाराष्ट्र बंद करायचा निर्णय घेतला. त्यासाठी मुंबई आणि बाकीच्या परिसरामध्ये शिवसेनेने पुढाकार घेतला. त्याचबरोबर काँग्रेस नेतेही महाराष्ट्र बंद साठी पुढे सरसावले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते यामध्ये फार पुढे नव्हते, पण त्यांनी सुरुवातीला महाराष्ट्र बंदच्या दृष्टीने आपल्या प्रभावक्षेत्रात थोडीफार तयारी करून महाराष्ट्र बंदला तोंडी पाठिंबाही दिला होता.
परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र अग्रक्रमाने पुढे येऊन मुंबई, ठाणे, नवी मुंबई त्याचबरोबर कोकणपट्ट्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आपले शक्तिप्रदर्शन करत महाराष्ट्र बंदची जोरदार तयारी केली. सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये महाराष्ट्र बंदचे पूरजोर समर्थन केले. त्यामुळे महाराष्ट्र बंद हा उपक्रम उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे, असे प्रस्थापित होत चालले होते.
Prithviraj Chavan : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट; दोघांत बंद दाराआड चर्चा
तसाही “बंद” मग मुंबई असो अथवा महाराष्ट्र, बंद हा विषय शिवसेना नावाच्या आक्रमक संघटनेचाच आहे. त्या खालोखाल काँग्रेसचा महाराष्ट्रात जोर असल्यामुळे काँग्रेसही पुढाकार घेऊन महाराष्ट्र बंद करू शकते, पण त्या तुलनेत शरद पवारांची राष्ट्रवादी आंदोलनाच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी कमजोर ठरते. सत्तेचे राजकारण करणे निराळे आणि आंदोलन करणे निराळे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीत खरे ठरते. त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र बंद तसाही शिवसेना अथवा काँग्रेसचा म्हणूनच गणला गेला असता. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची या बंद मागे फरफट झाली असती.
सरकारच्या बाहूंमध्ये बळ
या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपचे समर्थक गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात महाराष्ट्र बंद विरोध याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी होऊन मुंबई हायकोर्टाने उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर ठरविला. जर कोणी सक्तीने महाराष्ट्र बंद करत असेल, तर त्यावर कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने महाराष्ट्राच्या शिंदे – फडणवीस सरकारला दिले. त्यामुळे सरकारच्या बाहूंमध्ये एकदम “बळ” संचारले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करू असे म्हटले.
अर्थातच त्यामुळे उद्याच्या बंद मध्ये शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुसक्या आवळण्याची संधी सरकारला उपलब्ध झाली. या संधीचा लाभ घेत शिंदे – फडणवीस सरकार आपल्या पक्षांच्या नाड्या आवळेल हे शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी एकदम मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाचा हबका खाल्ला. शरद पवारांनी ट्विट करून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे आवाहन केले. त्या पाठोपाठ काँग्रेस नेत्यांनी देखील महाराष्ट्र बंदचे आवाहन मागे घेतले. या सगळ्या राजकारणात शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी चालबाजी करत उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडले.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करा, ही उद्धव ठाकरेंची मागणी धुडकावून काँग्रेस नेत्यांनी आधीच त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. शरद पवारांनी आमच्याकडून मुख्यमंत्रीपदीसाठी कोणीच नाही, असे सांगून हात झटकले. त्या पाठोपाठ उद्याच्या महाराष्ट्र बंदचा मुंबई हायकोर्टानेच फज्जा उडविल्यानंतर पवार आणि काँग्रेस यांना उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याची संधी मिळाली, ती त्यांनी पुरेपूर साधून घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App