विशेष प्रतिनिधी
मुंबई : समाजात दुर्लक्षित तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अंतर्गत तृतीयपंथी सेलची स्थापना करण्यात आली असून या सेलच्या अध्यक्षपदी अॅड. पवन यादव (Pawan Yadav) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पवन या कायद्याच्या पदवीधर असून मुंबई न्यायालयात वकिली करतात तसेच सारथी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत असतात.Pawan yadav appointed as Congress Transgender cell president
उज्ज्वला गॅसची सब्सिडी कमी केल्याने गरीब महिलांना गॅस सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी राज्यातील सर्व जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असून उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर परत करून मोदी सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे (Sandhya Sawwalakhe) यांनी दिली.
पंतप्रधान मोदींनी मोठा गाजावाजा करून महिलांना उज्ज्वला योजनेमार्फत मोफत गॅस देण्याची घोषणा केली. मात्र आता गॅस सिलेंडरच्या किंमती प्रचंड वाढल्याने महिलांना गॅस सिलेंडर घेणे परवडत नाही. उज्ज्वला योजनेच्या बहुतांश लाभार्थ्यांनी आता सिलेंडर अडगळीत टाकले असून त्या महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करत आहेत, असे प्रदेश काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने सिलेंडर मोदींना पाठवून या दरवाढीचा निषेध करण्यात येणार आहे. रविवारी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी महिला हे आंदोलन करणार आहेत. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे या पुणे येथे आंदोलन करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App