जगाला जर शांतता हवी असेल, तर हिंदू जीवनविचारांच्या आधारावरच पुढे जावे लागेल. याचे प्रारूप येत्या २५ वर्षांत संघ विकसित करेल, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण संयोजक शरदराव ढोले यांनी दिली.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्यानंतर घडलेल्या सगळ्या एपिसोड मध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरच दादागिरी केली.
भारतीय मानक ब्युरो (BIS) ने शुक्रवार (१८ जुलै) पासून ९ कॅरेट सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. आतापर्यंत, केवळ २४ कॅरेट, २३ कॅरेट, २२ कॅरेट, २० कॅरेट, १८ कॅरेट आणि १४ कॅरेट सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य होते. हॉलमार्किंग सोन्याच्या शुद्धतेची पुष्टी करते. तथापि, सोन्यापासून बनवलेल्या घड्याळे आणि पेनवर आता हॉलमार्किंग आवश्यक नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, महिलांना मागासलेल्या परंपरा आणि रूढींपासून मुक्त करणे खूप महत्वाचे आहे.महाराष्ट्रातील सोलापूर येथे ‘उद्योगवर्धिनी’ संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले- महिलांचे सक्षमीकरण हा कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे.
विधिमंडळात मारामारी, पोलीस स्टेशनमध्ये दादागिरी, सभागृहात जंगली रम्मी; अशी सगळीकडेच “पवार संस्कारितांची” त्यांची हुल्लडबाजी!!, असे चित्र महाराष्ट्रात उभे राहिलेय.
राज्यात हनीट्रॅपमुळेच शिंदे सरकार सत्तेत आल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य मूर्खपणाचे आहे. एका मोठ्या पदावर काम करणाऱ्या या व्यक्तीने केलेले हे वक्तव्य अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी ता. १९ हिंगोलीत पत्रकार परिषदेत दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या याचिकेद्वारे त्यांच्यावर हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचाराला खतपाणी घालण्यासह द्वेष पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. या याचिकेमुळे राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ठाकरे बंधूंची राजकीय युती होईल की नाही याची नाही खात्री; पण अमित शाहांनी फडणवीसांना केलेल्या सूचनांची संजय राऊतांकडे “पक्की माहिती”!!, असला प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणातून समोर आला.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी चर्चा आणि नियोजनामध्ये वेळ वाया घालवण्यात आला,” या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याशी सहमत होत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “लोकसभेनंतर आपणच मुख्यमंत्री होणार अशी अनेकांची अपेक्षा होती,” असे म्हणत त्यांनी पटोले यांची स्पष्ट नाव न घेता खिल्ली उडवली.
लोकसभा निवडणुकीतल्या यशाची डोक्यात हवा गेल्याची उद्धव ठाकरेंनी कबुली दिली. त्यांना विजय वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला. पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींच्या डोक्यात जी हवा गेली, ती कोण काढणार??, असा सवाल तयार झालाय.
हनीट्रॅपच्या आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत काँग्रेस आमदार नाना पटोले यांना धू धू धुतले होते. सभागृहाचा वेळ वाया घालविल्याबद्दल चांगलेच खडसावले होते. आज पुन्हा काँग्रेसचे दुसरे आमदार विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तेच आरोप केले आहेत.
ठाकरे हा ब्रँड बाळासाहेब ठाकरेंच्या नावामुळे होता. यांनी हिरव्या सापांना जवळ करत हा ब्रँड संपवला आणि आता बोलत आहे. यात आमची काय चुकी? त्यांची चुकी आहे. त्यांनी हिंदुत्व सोडले. उबाठामध्ये केवळ आदित्य ठाकरे,उद्धव ठाकरे राहणार आहेत, असा हल्लाबोल भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
: ठाकरे बंधूंचे ऐक्य असो किंवा दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण असो हे दोन्ही निर्णय ठाकरे किंवा पवार यांनी स्वतंत्रपणे घेण्यासारखे उरलेलेच नाहीत. ते निर्णय घेणे किंवा न घेणे हे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या हातात जाऊन बसलेत.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी (18 जुलै) शेवटचा दिवस होता. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी झाली. त्याचे तीव्र पडसाद शेवटच्या दिवशी सभागृहात उमटले. विरोधकांनी या मुद्यावरून टीकेची झोड उठवत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने तेवढ्याच शिताफीने त्यांचा डाव उधळवून लावला.
विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. 3 वर्षांपासून माझ्या नावाने फक्त शिव्या-शाप सुरू आहेत. सभागृहात दोन दिवस चर्चा जाळली, मी अंबादास यांचे कौतुक करत होतो, कोणाला काय इतके लागण्याचे कारण नव्हते. पावसाळ्यात छत्र्या उगवतात की बेडूका, परंतु एवढ्या लवकर रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या परिसरात गुरूवारी झालेल्या हाणामारीवर तीव्र संताप व्यक्त केला. कालच्या घटनेमुळे कुणा एकाची प्रतिष्ठा गेली नाही. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. आज या ज्या शिव्या बाहेर पडत आहेत, त्या एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते की, हे सगळे आमदार माजले म्हणून, असे ते म्हणालेत.
विधानसभा अध्यक्षांनी काल झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे विधान भवन परिसरामध्ये अधिवेशन चालू असताना केवळ आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. काल झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर भूमिका घेत, हा निर्णय आज जाहीर केला.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा बुधवारी निरोप समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांचे कौतुक करत टोलेबाजी देखील केली. यावेळी सभागृहात उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी त्यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली होती. तिकडे स्कोप नाही पण इकडे आहे, तुम्ही येऊ शकता, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना उद्देशून म्हटले.
अनेक वर्षांनी आम्ही दोघे एका व्यासपीठावर एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. परंतु, त्यानंतर राज ठाकरे यांनी युतीबद्दल सावध भूमिका घेतली असून मराठीच्या मुद्यासाठी आम्ही एकत्र आलो असून यात राजकीय मुद्दा नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक जाहीर होऊ द्या, मग चर्चा करू शकतो.
त्रिभाषा धोरणानंतर महाराष्ट्रातील वातावरण पेटलं असून सरकारला शेवटी हे धोरण मागे घ्यावं लागलं. त्यानंतर मुंबईत मराठी-हिंदी वाद पाहायला मिळाला. तसेच, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आव्हान केले होते. तुम्ही उत्तर भारतात येऊन दाखवा, तुम्हाला पटक-पटक के मारेंगे असे दुबे म्हणाले होते. यावर आज मीरा रोडमध्ये बोलतांना राज ठाकरे यांना खासदार निशिकांत दुबे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
बरोबरच आहे राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीस कशाला लिहून देतील??, पण…, हे शीर्षक काही सहज सुचलेले नाही.
गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून पत्रकारांनी फडणवीसांना छेडले; पण अजितदादांना शेजारी बसवून फडणवीसांनी आव्हाडांचेही वाभाडे काढले!!, असे आज विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसानंतर पत्रकार परिषदेत घडले.
मारामारीचा खेद व्यक्त करतानाही जितेंद्र आव्हाडांची नसती मखलाशी, जयंत पाटलांची मध्यस्थी; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दोघांवर वरकडी!!, हे विधानसभेत घडले.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्यानंतर घडलेल्या सगळ्या एपिसोड मध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरच दादागिरी केली
विधिमंडळाच्या आवारात झालेल्या मारामारीच्या प्रकरणात पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचा समर्थक कार्यकर्ता नितीन देशमुखला अटक केली. पोलिसांनी त्याला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेऊ नये
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App