राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चां सध्या सुरू आहेत. , आठ मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, असे या सामना या शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रात म्हटले आहे. यामध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे नावही घेतले गेले आहे. सामनामध्ये बातमी आली म्हणजे काहीतरी होणार असा अर्थ कधीच होत नाही, असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषि खात्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी मिळालेल्या कथित क्लीनचिटवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे हे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका, असे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला बजावले आहे. त्यांनी
राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असून काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारले असता या संदर्भातील सर्व अधिकार हे मुख्यमंत्री यांचे असतात. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे?
अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली कवाडे बंद केली आहेत. अजित पवार यांनी स्वतः आपल्याला हा शब्द दिल्याचा दावा विजय घाडगे यांना केला आहे. सोबतच विधिमंडळात रमी खेळण्याचा आरोप झालेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही मंगळवारपर्यंत योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन अजित पवारांनी दिल्याचे घाडगे म्हणाले.
धनंजय मुंडे यांना सत्यमेव जयते असे म्हणणे शोभत नाही. ते कोणत्याही अंगाने क्लिन अर्थात स्वच्छ नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित सुमारे ५० कंपन्यांवर आणि ३५ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) २४ जुलै रोजी मोठी कारवाई केली. ही कारवाई मुंबई आणि दिल्लीतील विविध ठिकाणी करण्यात आली असून, यामागे ३००० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीचा आरोप आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जेव्हा रस्ते बांधकामात निष्काळजीपणा होतो, तेव्हा फक्त कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांविरुद्धच एफआयआर का दाखल करण्यात आला? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांची जबाबदारी का निश्चित करण्यात आली नाही?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होईल. चार वादग्रस्त मंत्र्यांबरोबरच अन्य चार मंत्र्यांना हे नारळ देण्यात येईल, अशा गौप्यस्फोटाच्या बातम्या वेगवेगळ्या सूत्रांच्या हवाल्यांनी मराठी माध्यमांनी पेरल्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील ऑनलाईन रमी प्रकरणी लवकरच कडक कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, याआधीही त्यांनी कोकाटेंना योग्य इशारा दिला होता की ‘इजा-बिजा झाली, तिजा होऊ देऊ नका’. मात्र आता पुन्हा एकदा प्रकरण घडल्याने गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा आणि शिवरायांच्या सामरिक शिक्षणावर आधारित दोन महत्त्वपूर्ण केंद्रांचे उद्घाटन केले. या वेळी दिलेल्या भाषणात त्यांनी मराठी भाषा, इतर भारतीय भाषांचे महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे सामरिक विचार आणि सध्या सुरू असलेल्या भाषावादावर सखोल भाष्य केले. भाषणात त्यांनी भाषा, संस्कृती आणि अभिमान यांचे समतोल साधताना एक समंजस, पण ठाम भूमिका मांडली.
महाराष्ट्रात सध्या आमदारांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. कोणी मारामारी करत आहे, तर कोणाच्या घरात पैशांनी भरलेली बॅग दिसून येत आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात मोबाइलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गौरवासाठी तयार केल्या गेलेल्या “महाराष्ट्र नायक” या कॉफी टेबल बुक मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी लेख लिहून फडणवीस यांच्या नेतृत्व क्षमतेची अफाट स्तुती केली.
राज्य सरकारने सुमारे १८ वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण- २०२५ जाहीर केले. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबईत मराठी माणसासाठी आरक्षणाचे आश्वासन दिले होते. ते पाळले गेले नाही. मात्र, या धोरणानुसार विद्यार्थी, ज्येष्ठांच्या गृहप्रकल्पांना मुद्रांक शुल्क तसेच एफएसआयमध्ये (चटई क्षेत्र निर्देशांक) सवलत दिली जाणार आहे.
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी आपल्याला झालेल्या मारहाणीचा जाब थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्याचा निर्णय घेतला आहे. “मी काय चूक केली? मी कुणाला वाईट बोललो का? जर काही चूक झाली असेल, तर त्यांनीच मला समोर सांगावं, असे सांगत ते लातूर येथी रुग्णालयातून थेट मुंबईला निघाले आहेत.
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या वादात आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकनाथ खडसे… तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत?” असा खोचक सवाल करत महाजन यांनी प्रफुल लोढा आणि खडसे यांचा एकत्र फोटो X (माजी ट्विटर) या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सन्मानासाठी तयार केल्या गेलेल्या “महाराष्ट्र नायक” या कॉफी टेबल बुक मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी लेख लिहून फडणवीस यांच्या नेतृत्व क्षमतेची अफाट स्तुती केली.
राज्यात सध्या गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रफुल लोढाकडे काही महत्त्वाचे पुरावे असल्यानेच त्याला विविध गुन्ह्यांमध्ये अडकवून जाणीवपूर्वक ताब्यात ठेवण्यात आले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.
पुणे जिल्ह्यातील दौड येथील एका कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेला वाचा फोडली आहे. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी हा अंदाधुंद गोळीबार करणारा कोण? हे शोधण्याची गरज आहे. पण ते हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणालेत.
राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर अद्याप सरकारकडून ठोस पावले उचलली गेली नसतानाच दुसरीकडे बँकांकडून सक्तीची वसुली सुरू असल्याने माजी मंत्री बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत. अमरावतीमध्ये एका बँक मॅनेजरला थेट फोन करून ‘शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली केली, तर तिथेच ठोकून काढू!’ अशी इशारा वजा धमकी बच्चू कडू यांनी दिली.
राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्फोटक आरोप करत सरकारची चांगलीच कोंडी केली आहे.
फडणवीस सरकार वरल्या आरोपांच्या गदारोळात महामंडळाचे सत्ता वाटप बिनबोभाट!!, हे महाराष्ट्रातल्या महायुतीच्या फडणवीस सरकारने घडवून आणले.
पवार संस्कारित” इतर नेत्यांचे काढायचे वाभाडे; पण सगळी पदे पवारांच्याच घरात खेचायचे डाव खेळायचे!!, असला प्रकार पवार कुटुंबीयांकडून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांच्यावर अर्धीच कारवाई करायचे घाटत असल्याची बातमी समोर आली आहे.
“पवार संस्कारित” इतर नेत्यांचे काढायचे वाभाडे; पण सगळी पदे पवारांच्याच घरात खेचायचे डाव खेळायचे!!, असला प्रकार पवार कुटुंबीयांकडून सुरू आहे.
२००६च्या मुंबईतील साखळी ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात महाराष्ट्र सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणीसाठी अपील केले होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, या सर्व शुभेच्छांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कौतुकाने. देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी असून भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ राजकारणी अशा शब्दांत ठाकरेंनी स्तुती केली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App